30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रPune News : पुणे शहरात 'सेक्स्टॉर्शन' वाढले! पोलिस आयुक्तांचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन

Pune News : पुणे शहरात ‘सेक्स्टॉर्शन’ वाढले! पोलिस आयुक्तांचे नागरिकांना सावधानतेचे आवाहन

पुण्यातील दत्तवाडी येथील एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला काही ऑनलाइन भामट्यांनी 'ब्लॅकमेल' केले आणि त्याचे नग्न छायाचित्र सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्याने फसवणूक करणाऱ्यांना 4,500 रुपयेही दिले.

पुण्यातील दत्तवाडी येथील एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला काही ऑनलाइन भामट्यांनी ‘ब्लॅकमेल’ केले आणि त्याचे नग्न छायाचित्र सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्याने फसवणूक करणाऱ्यांना 4,500 रुपयेही दिले, मात्र तो जास्त काळ हा दबाव सहन करू शकला नाही आणि 28 सप्टेंबर रोजी त्याने आत्महत्या केली. त्याचप्रमाणे शहरातील धनकवडी भागातील 22 वर्षीय विद्यार्थिनीनेही सायबर गुन्हेगारांकडून छळ करून ‘ब्लॅकमेल’ होऊन आत्महत्या केली. गुन्हेगारांनी तिला धमकी दिली होती की जर तिने त्यांचे ऐकले नाही तर ते तिचा नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतील.

पोलिसांनी सांगितले की, ‘सेक्स्टॉर्शन’ (वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओंद्वारे ब्लॅकमेल आणि खंडणी) प्रकरणांची ही काही उदाहरणे आहेत. सायबर गुन्हेगार सतत सोशल मीडियाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करत असतात. या एका वर्षात एकट्या पुण्यात 1400 हून अधिक ‘फक्तवणूक’च्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस लोकांना ‘इन्स्टंट मेसेजिंग’ प्लॅटफॉर्मवर कोणत्याही अनोळखी महिलेशी बोलू नये, असा इशारा देत आहेत.

हे सुद्धा वाचा

Manava Naik : मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरव्यवहार करणारा कॅब ड्राईव्हर गजाआड

Ayushmann Khurrana Kartik Aaryan : आयुष्मानच्या दिवाळी पार्टीत कार्तिक आर्यन मालामाल! पाहा व्हिडिओ

Manisha Kayande : ठाण्यातील पिडीत तरुणीला मनिषा कायंदे यांचा दिलासा! राहत्या घरी जाऊन तरुणीची भेट

जानेवारी 2022 पासून पुण्यात अशी एकूण 1,445 प्रकरणं
पुण्यातील सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक मीनल पाटील म्हणाल्या, “जानेवारी 2022 पासून पुण्यात अशा एकूण 1,445 प्रकरणांची नोंद झाली आहे. या प्रकरणांमध्ये पीडित महिलांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध ‘सेक्स्टॉर्शन’ आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारी केल्या आहेत. काही गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे. दुसरीकडे, कर्ज ऍप्सद्वारे फसवणूक आणि सेक्सटोर्शनसारख्या वाढत्या ऑनलाइन फसवणुकीला तोंड देण्यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल स्थापन केला आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, “सायबर सेल पोलिस ठाण्यांचा भार कमी करण्यासाठी आम्ही शहरातील सर्व 32 पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र सायबर सेल स्थापन केला आहे. लोक या पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन फसवणुकीची तक्रार करू शकतात.”

दरम्यान, येत्या काही वर्षात सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी पुणे पोलिस पूर्णपणे सज्ज असल्याचेही अमिताभ गुप्ता यांनी सांगितले असून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे,शिवाय अशी प्रकरणात पोलिसांकडे उघडपणे तक्रार करावी असे आवाहनही केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी