32 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरमहाराष्ट्रधक्कादायक! पुण्यात रेल्वे पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धक्कादायक! पुण्यात रेल्वे पोलिसांकडूनच अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली असून चक्क रेल्वे पोलिस (Railway Protection Force) कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी, (7 नोव्हेंबर) दोघांना अटक केली असून यात एका महिलेचाही समावेश आहे. मुख्य आरोपी असलेला रेल्वे पोलिस हवालदार अद्याप फरार आहे. हवालदाराने रेल्वेच्या जागेत बेकायदा संस्था उभारली होती. संस्थेच्या या जागेतच त्याने हे लज्जास्पद कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे, रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा सामान्य जनतेने कुणाकडे बघायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत असून, रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या आणखी काही मुलींवर साथीदारांच्या मदतीने दुष्कर्म केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी करण राठोड आणि सुश्मिता कसबे या दोघांना अटक केली असून न्यायालयाने या दोघांनाही 12 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात यापूर्वी कमलेश तिवारी या इसमाला अटक करण्यात आली होती. तर, मुख्य आरोपी असलेला रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार अनिल पवार पसार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एका अल्पवयीन मुलीने पुणे स्थानक लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली असता हे प्रकरण उघडकीस आले. पीडिता ही दहावीत शिकणारी विद्यार्थिनी असून तिच्या प्रियकरासोबत मागील महिन्यात पुणे रेल्वे स्थानक येथे पळून आले होते. दोघेही मूळचे छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. हवालदार पवार याने त्यांना पाहिले असता आपल्या सिद्धार्थ मल्टिपर्पज नामक बेकायदा संस्थेत घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार करून तिच्या प्रियकराला धमकाऊन त्याच्याकडून पैसे उकळले.

हे ही वाचा 

भेसळ पदार्थांवर बसणार चाप; तब्बल १०७ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

‘ड्रग्ज पुरवठादार एकनाथ शिंदेंच्या जोडीला’

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ कोण?

नंतर, पीडितेच्या पालकांनी मुलगी हरवल्याची तक्रार केली असता छत्तीसगड पोलिसांनी पुणे गाठून पीडितेला घेऊन गेले. तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने घरी सांगितला असता हे प्रकरण उघडकीस आले. सदर प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करीत असून लवकरच फरार मुख्य आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी