28 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरमहाराष्ट्रपुण्यात पाणी कपातीबाबत महिनाभराने पुन्हा आढावा बैठक होणार !

पुण्यात पाणी कपातीबाबत महिनाभराने पुन्हा आढावा बैठक होणार !

राज्यात यंदा पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी पाणीप्रश्न निर्मान झाला आहे. पुणे शहरात पाणी कपात होणार असल्याबातब चर्चा होत होत्या. मात्र सध्या तरी पुणेकरांवरील पाणी कपात टळली आहे. सध्या खडकवासला धरणात पुरेसे पाणी असल्याने पाणीपुरवठ्यावर कोणताही परिनाम होणार नाही. पुणे शहराबरोबरच शेतीसाठी देखील नियोजनानुसार पाणीपूरवठा केला जाणार असून येत्या काळात पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले.

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकत शनिवारी पुण्यात पार पडली यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली. पवना आणि चासकमान धरणामध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे, तसेच भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा 
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

नीरा प्रणालीत सध्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी कमी पाणी
नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसीने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना चंद्रकात पाटील यांनी बैठकीवेळी दिल्या.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी