29 C
Mumbai
Saturday, September 9, 2023
घरमहाराष्ट्र3 फुटांच्या पुंगनूर गायी पाच किलो चारा खातात आणि देतात पाच लिटर...

3 फुटांच्या पुंगनूर गायी पाच किलो चारा खातात आणि देतात पाच लिटर दुध

शेतकऱ्यांना पशुपालनामुळे आर्थिक गाडा चालविण्यासाठी मोठी मदत होते, रोजचे खर्च भावताना काहीशी बचत करुन छोटी मोठ्या आर्थिक गरजा देखील भागविल्या जातात. त्यामुळे पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असतो. अलिकडे पशुपालनातून शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक प्रगती केल्याचे देखील दिसून येते. वेगवेगळ्या जातींच्या गायी, म्हैशी, शेळ्यांचे पालन महाराष्ट्रात केले जाते.

देशात गायींच्याच जवळपास ५० देशी जाती आढळून येतात. यात दुर्मिळ होत चाललेली परंतू शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी पुंगनूर गाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. उंचीने साधारण तीन ते साडेतीन फुटांच्या या गायी आंध्रप्रदेशात आढळतात. या गायी उंचीने कमी असल्या तरी साधारण चांगली जोपासना केल्यास 3 ते 5 लिटरपर्यंत दुध देतात. त्यांचा संगोपनाचा खर्च देखील कमी येतो. आकाराने छोट्या असलेल्या या गायींना चारा देखील त्यामानाने कमीच लागतो. त्यामुळे आता काही शेतकरी पुंगनूर गायीं पाळण्याकडे वळत आहेत.

पूंगनूर गायींच्या दुधात स्निग्धांश देखील जास्त प्रमाणात असल्याने या दुधाची फॅट चांगली असते. त्यामुळे दुधाला दर देखील मिळतो. साधारण पणे गायीच्या दुधाची फॅट 3 ते 3.5 असते. मात्र पूंगनूर गायीच्या दुधाची फॅट 8 पर्यंत असल्याचे सांगितले जाते. या गायींची उंची साधारण दीड फुट ते 3 फुटांपर्यंत असते. तर वजन 100 ते 150 किलो पर्यंत असते. या गायी चांगले दुध देत असल्याने तसेच त्यांच्यासाठी येणारा खर्च देखील कमी असल्याने काही शेतकरी आता पूंगनुर गायी पाळत आहेत. या गायींना साधारण दिवसाला 5 किलो चारा लागतो.

हे सुद्धा वाचा 
गिरीजा ओकला बॉलीवुडमध्ये आले सुगीचे दिवस
‘ये दिल मांगे मोअर’… कॅप्टन विक्रम बत्रा यांचा पाकिस्तानी सैन्याने घेतला होता धसका
भाजपचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मुलाला देणार टक्कर ?

साधारण 40 हजार रुपयांपासून या गांयींची किंमत असते. दोन गायींसाठी 80 ते 1 लाखांपर्यत खर्च येतो. या गायींची किंमत देखील परवडणारी असते. या गायींच्या शेणाला आणि गोमुत्राला दुर्गंध येत नसल्यामुळे धार्मिक कार्यक्रमात त्याचा वापर होतो, असे देखील काही शेतकरी सांगतात. या गायीचे दुध तसेच गोमूत्र व शेण आयुर्वेदीक असल्याचे देखील सांगितले जाते. या गायी स्वभावाने अतिशय शांत असतात त्यामुळे कुटुंबातील कोणीही या गायींची देखरेख करु शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी