30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील 50 गावात आता सामाजिक सभागृह

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील 50 गावात आता सामाजिक सभागृह

राज्य सरकारने दिली मान्यता; ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांची माहिती; ग्राम विकास विभागाने 24 मे रोजी काढले परिपत्रक; जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक 7 गावे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील 50 गावात आता सामाजिक सभागृह बांधले जाणार आहेत. राज्य शासनाने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. ग्राम विकास विभागाच्या वतीने 24 मे रोजी याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

राज्यातील गावांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्याबाबत 18 जानेवारी 2023 रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी 50 गावांचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ग्राम विकास विभागाच्या वतीने 24 मे रोजी याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

50 निवडक गावात जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर, आदी जिल्ह्यांतील गावां समावेश आहे. या गावात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याबाबत आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृहसभागृह बांधण्यात येणारी गावे पुढीलप्रमाणे –

नंदुरबार जिल्हा :
शहादा – म्हसावद.

जळगाव :
जामनेर तालुका – पहूरपेठ, वाकोद, पहूरकसबे.
पाचोरा – लोहारा, कुऱ्हाड.
जळगाव – म्हसावद.
रावेर – अहिरवाडी
बोदवड – शिरसाला.
चोपडा – चहार्डी.
धरणगाव – पाळधी.

जालना : 
जालना – घाणेवाडी.

संभाजीनगर : 
जाफराबाद – टेंभुर्णी.
भोकरदन – चिंचोली निपाणी.
परतुर – आनंदगाव.

नगर:
अहमदनगर – निमगाव घाना.
पाथर्डी – मोहरी.
राहता – आस्तेगाव.
नेवासा – मुकिंदपूर.

पुणे :
पुरंदर – नागरे.
आंबेगाव – जाडकरवाडी.
खेड – भरणे.

सातारा :
फलटण – कांबळेश्वर.
माण – टाकेवाडी.
कोरेगाव – वाठार स्टेशन.

कोल्हापूर :
हातकंणगले – पट्टनकोडोली.
भुदरगड (गारगोटी) – अदमापूर.
करवीर – वाशी.

सिंधुदुर्ग :
कणकवली – तरंदल (धनगरवाडी).

नांदेड :
लोहा – माळेगांव, रीसनगांव.
नायगाव (खै) – शेळगाव (छत्री).
नायगांव – नरसी.
देगलूर – वझरगा.

 

यवतमाळ :
उमरखेड – पोफळी.
नेर – मंगलादेवी.
वणी – चिखलगाव.
दारव्हा – धनगरवाडी.
पुसद – मारवाडी बु.

अमरावती :
भातकुली – वाठोडा शुक्लेश्वर.

नागपूर :
कळमेश्वर – घोराड.
नरखेड – रोहणा, इंदरवाडा
उमरेड – बेला.
सावनेर – केळवद.

चंद्रपूर :
सावली – खेडी.
मूल – बेम्बाळ.
कोरपना – थुतरा.
वरोरा – तेमुर्डा.
गोडपिंपरी – भंगाराम तळोधी.
सिंदेवाही – नवरगाव.

हे सुद्धा वाचा : 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी त्या काळात सातबारा निर्माण केला : डॉ. उज्ज्वला हाके

भाजपकडून अहिल्यादेवी होळकरांची अवहेलना, धनगर समाजात नाराजी

बारामतीच्या आजोबा अन् नातवाला राजकारणासाठी अहिल्यादेवींचा साक्षात्कार झालाय : गोपीचंद पडळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्या वतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात देण्यात येणार आहे. सर्व सोयी- सुविधायुक्त सुसज्ज असे 50 सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत. या माध्यमातून धनगर तसेच भटके विमुक्त जाती जमाती व ओबीसी जमातीच्या लोकांसाठी या सभागृहातच्या माध्यमातून सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम या सभागृहात आयोजित करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती माजी खासदार विकास महात्मे यांनी दिली आहे.

या 50 गावात सर्वाधिक 7 गावे मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल, चंद्रपूरमधील सहा आणि यवतमाळमधील पांच गावे आहेत. ज्या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्री अहिल्याबाईंनी धर्मशाळांचे बांधकाम केले, त्या नाशिक व बीड जिल्ह्यातील एकाही गावाचा यादीत समावेश नाही. 

Punyaslok Ahilyabai Holkar, Minister Girish Mahajan, Ahilyabai Holkar Memory Social Halls, Ahilyabai Holkar, Social Halls In 50 Villages

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी