29 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमहाराष्ट्रभारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीसाठी कॉँग्रेसचा मोदी सरकारविरोधात 'स्पेशल' कार्यक्रम

भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीसाठी कॉँग्रेसचा मोदी सरकारविरोधात ‘स्पेशल’ कार्यक्रम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुमारे 4 हजार किलोमिटर चालून भारतातील विविध राज्यांमधील लाखों लोकांना भेटण्याचे तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम भारत जोडो यात्रा काढून केले होते. या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा काढून या यात्रेचा पहिला वर्धापन दिन साजरा करणार आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही कमालीची यशस्वी झाली होती. ह्या यात्रेमुळे कॉँग्रेसला एकप्रकारे नवसंजीवणी मिळाली होती. तसेच, राहुल गांधी यांची जनमाणसांमधील प्रतिमा ही कमालीची उंचावलेली होती. तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून निघालेली ही पदयात्रा राहुल गांधी आणि त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी मजल दरमजल करत पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीर ची राजधानी श्रीनगर येथील लाल चौकात या यात्रेचा शेवट झाला. या यात्रेमुळे कॉँग्रेसला कर्नाटक विधानसभेत घवघवीत यश मिळाले आणि कर्नाटकातील भाजपची सत्ता संपुष्टात आली.

येत्या 7 सप्टेंबरला या यात्रेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र कॉँग्रेसने एक मोठा कार्यक्रम आखला आहे. यानिमित्ताने, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते पत्रकार परिषद घेणार असून मोदी सरकारच्या 9 वर्षातील कारकीर्दीबाबत पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी पदयात्रा काढली जाणार आहे व त्यानंतर जाहीर सभा घेतली जाणार आहे. सर्व जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपासून भारत जोडो यात्रेची सुरुवात केली जाणार आहे.

हे ही वाचा 

एक फुल, दोन हाफने लाठीचार्जचे खापर पोलिसांवर फोडले

सनातन धर्म वादात ‘हे’ काय म्हणाले प्रियांक खरगे?

मोदींवरील भाजपच्याच ट्विटचा दाखला देत आव्हाडांनी केली पंचाईत

या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्यांवर जिल्हावार जबाबदारी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर, नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अहमदनगरमध्ये विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अकोलामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पुणे जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ठाणे जिल्ह्यात प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसिम खान, नाशिकमध्ये सी डब्ल्यू सी सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, कोल्हापूरमध्ये विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, औरंगाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूरमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आणि जळगावमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी