काँग्रेस नेते राहुल गांधींना थंडी का वाजत नाही? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे. (Rahul Gandhi not feel Cold) दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी टी-शर्ट घालतात, त्यावरून आता ट्विटरबाजी सुरू आहे. भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचली, तेव्हाही राहुल गांधींना हाच प्रश्न विचारण्यात आला होता.
दिल्लीत असलेले राहुल गांधी सोमवारी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळी पोहोचले. त्यावेळीही त्यांनी फक्त पांढरा टी-शर्ट घातलेला होता. यावरून, त्यांना थंडी जाणवत नाही का, असा प्रश्न सोशल मीडियातील युझर्सना पडला. खरेतर, सध्या दिल्लीत अगदी कडाक्याची थंडी आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घसरण होत आहे. स्वेटर, वूल वैगेरे उबदार कपड्यांनी दिल्लीकर आपले संरक्षण करत आहेत. स्वेटर, जर्कीनशिवाय जगणेही अशक्य असल्याची त्यांची भावना आहे. त्यात राहुल गांधी हे फक्त टी-शर्ट घालून कसे इतके मजेत आणि नॉर्मल राहू शकतात, हा प्रश्न सामान्य दिल्लीकरांनाही पडला आहे.
भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचली तेव्हाही राहुल गांधींना हा प्रश्न विचारला गेला. “तुम्हाला थंडी वाजत नाही का?” या प्रश्नाला थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. त्यावर राहुल गांधी यांनी प्रतिप्रश्न केला होता. “देशातील गरीब जनता, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना थंडी वाजत नाही का? मलाही ते जाणून घ्यायचे आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. भारत जोडो यात्रेत ते फक्त टी-शर्ट घालूनच दिसले आहेत. “मला थंडी वाजते की नाही, यापेक्षा देशातील विद्यार्थी, शेतकरी आणि गरीबांना थंडी वाजत नसेल का, याची काळजी करणे जास्त गरजेचे आहे,” ही राहुल गांधी यांची भावना विचार करायला लावणारी आहे.

हे सुद्धा वाचा :
शेतकरी, कामगारांच्या खिशातून मोदी खोऱ्याने पैसे ओढत आहेत; राहुल गांधी यांचा घणाघात
हिवाळ्यात तिळाचे पदार्थ खाण्याचे आरोग्यदायी फायदे ; पाहा सोपी रेसिपी
न्यू यॉर्कमध्ये आणीबाणी : बॉम्बने केले अमेरिकेतील जनजीवन ठप्प; तापमान उतरले -45 अंश सेल्सिअसवर!
ट्विटरवरही, “राहुल गांधींना थंडी का वाजत नाही,” यावरून काथ्याकूट सुरू आहे. त्यावरून ट्विटर यूजर्सचा मजेशीर संवाद सुरू आहे. या प्रश्नाच्या उत्तरात नेटकरी अगदी मजेशीर कॉमेंट्स करत आहेत. एका यूझरने विचारले, “राहुल, तुम्हीच सांगा तुमच्या एनर्जी आणि फिटनेसचे रहस्य काय आहे?” लक्ष्मण नावाच्या यूझरने टिप्पणी केली की, ‘राहुल गांधी यांची प्रतिकारशक्ती इतकी जास्त आहे की, ते फक्त टी-शर्ट घालूनच उत्तर भारतातील थंडीत फिरू शकतात. पुढील काळात भारताचे नेतृत्व करण्यासाठी ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करो.”
आणखी एका यूझरने लिहिले की, ‘थंडीत टी-शर्ट घालून फिरतात म्हणून त्यांना पीएम बनवा!’ एका महिला युझरने टोमणा मारला की, पैशामध्ये खरोखरच खूप उष्णता असते. रॉबर्ट डाउनी नावाच्या युझरने टिप्पणी केली की, “दिल्लीचे तापमान 9 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तरीही राहुल गांधी फक्त टी-शर्ट घालतात. एवढी एनर्जी कुठून येते भावा?”