33 C
Mumbai
Monday, December 5, 2022
घरमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांना झाली 'या'...

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांना झाली ‘या’ मित्राची आठवण, म्हणाले….

राजीव माझे मित्र होते, काम चांगले करायचे, त्यांनी नेहमीच तुमच्यासाठी काम केले, असे म्हणत राहूल गांधी यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना आज उजाळा दिला. कळमनुरीच्या सभेत बोलताना आज राहूल गांधी यांना त्यांच्या दिवंगत मित्राची आठवण झाली.

राजीव माझे मित्र होते, काम चांगले करायचे, त्यांनी नेहमीच तुमच्यासाठी काम केले, असे म्हणत राहूल गांधी यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना आज उजाळा दिला. कळमनुरीच्या सभेत बोलताना आज राहूल गांधी यांना त्यांच्या दिवंगत मित्राची आठवण झाली. त्यांच्या आठवणी जागवत आज भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांनी भाषण केले. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज पदयात्रेचा आजचा दिवस संपला. यावेळी चौकसभेत राहूल गांधी बोलत होते.

यावेळी बोलताना राहूल गांधी म्हणाले, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही, पैसाही नाही. शेतात राबराब राबणाऱ्या शेतकरी देशोधडीला लावला आहे. पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दमडीही मिळत नाही, विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट करत आहेत.
कळमनुरी भागात काही शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेल्याचे दाखवले, सोयाबीन पुर्णपणे जळून गेले होते पण पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही. कोणाकडे दाद मागावी हेही समजत नाही अशी अवस्था असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले, मोदी सरकारच्या काळात शेतकरी व शेती संपवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांकडून विमाचे हप्त्यापोटी पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाई मात्र मिळत नाही, मिळाली तर अत्यंत तुटपुंजी मिळते. मोदी सरकारमध्ये पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत आणि शेतकरी मात्र कंगाल झाला आहे.
हे सुद्धा वाचा :
Palghar News : पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम रखडले, भाजपच्या पदाधिकाऱ्याचा सरकारला घरचा आहेर

Jitendra Awhad Bail : जितेंद्र आव्हाड तुरूंगाबाहेर, जामीन मंजूर; फडणवीस काय म्हणाले?

Explosive Found In River : रायगडमधील नदीत जिलेटिनच्या काठ्या आढळल्याने खळबळ

देशात द्वेष पसरवला जात आहे, भांडणे लावली जात आहेत पण या देशात द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही. भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून निघाली असून श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवूनच थांबणार आहे. देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन आम्ही ही पदयात्रा काढली असून तुमचे प्रेम व शक्तीच आम्हाला चालण्याची प्रेरणा देते, असेही राहुल गांधी म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!