32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : शिवाजी महाराजांना जिजाऊंनी मार्ग दाखवला म्हणून ते छत्रपती...

Bharat Jodo Yatra : शिवाजी महाराजांना जिजाऊंनी मार्ग दाखवला म्हणून ते छत्रपती झाले; राहूल गांधींचे शेगावात प्रतिपादन

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे, ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते.

द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे, ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जीजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले, असे प्रतिपादन खासदार राहूल गांधी यांनी शेगाव येथील सभेत केले.

राहूल गांधी म्हणाले, मागील आठ वर्षात देशात सामाजिक विषमता वाढीस लागली आहे. शेतकरी प्रचंड संकटात आहे, तरुण वर्ग नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यांच्या समस्या कोणी ऐकत नाही. मुलांच्या शिक्षणावर पालकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. मुले इंजिनिअरींगचे शिक्षण घेतात आणि त्यांना एखादी खाजगी टॅक्सी चालवावी लागते किंवा किरकोळ काम करावे लागते. पालकांनी यासाठी एवढा खर्च केला का? तरूण, शेतकरी उघड्यावर आहेत आणि दुसरीकडे याच देशात काही मुठभर लोकच श्रीमंत होतात, असा हिंदुस्थान नको आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही, असे खासदार राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला आधाराची गरज आहे. पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळ यात शेतक-याचे मोठे नुकसान होते पण त्यांना भाजपा सरकार मदत करत नाही, नुकसान भरपाई देत नाही. पीकविमाही मिळत नाही. शेतकरी 50 हजार, एक लाख रुपयांचे कर्ज काढतात पण ते माफ होत नाही आणि मोठ्या उद्योगपतींचे लाखो करोडे रुपयांचे कर्ज माफ होते. शेतकरी संकटात सापडतो, त्रस्त होती तेव्हा तो जीवन संपवण्याचे टोकाचा निर्णय घेतो. विदर्भातील शेतक-यांचे कळताच युपीए सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केली पण आजचे सरकार शेतक-यांचा आवाज ऐकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी शेतक-याची पीडा, समस्या, दु:ख ऐकून घेतले तर एकही आत्महत्या होणार नाही.
हे सुद्धा वाचा :

Shraddha Murder Case : आफताबची होणार नार्को टेस्ट; न्यायालयाने दिले आदेश

Aditya Thackeray : मुंबईत चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या आदेशाने? आदित्य ठाकरेंचा सवाल

MNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले

कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरू झाली असून जनतेचे ऐकून घेत आम्ही पुढे जात आहोत. मी तुमचे दुःख ऐकण्यासाठी आलो आहे. पण काही लोक हिंसा, द्वेष, भिती पसरवण्याचे काम करत आहेत. भीती, हिंसा, द्वेष यामुळे नुकसान होते, प्रेम, बंधुभाव अहिंसा याने लोक एकछूट होतात. विरोधक विचारात की देशात कुठे आहे सिंसा, भीती, द्वेष ? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांनी जर रस्यावर उतरून लोकांचा आवाज ऐकले तर मग कळेल की द्वेष, हिंसा, भिती कुठे आहे, असे राहूल गांधी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी