33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअरबी समुद्रात चक्रीवादळ; मुंबई, ठाण्यात पाऊस कधी पडणार ?

अरबी समुद्रात चक्रीवादळ; मुंबई, ठाण्यात पाऊस कधी पडणार ?

गेल्या अनेक दिवसापासून कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबई, ठाणे आणि कोकण वासियांसाठी गूड न्यूज येऊन धडकली आहे. आठवडाअखेरीस मुंबई, ठाण्यासह कोकणात पाऊस कोसळणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील दोन दिवसांत त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हा पाऊस पडणार आहे.

हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा अंदाज काही खासगी संस्थांनी वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सिअस असावे लागते. सध्या अरबी समुद्राचे तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असून ते चक्रीवादळास अनुकूल आहे. दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, अंदमान आणि निकोबार बेटापर्यंत पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथ सुरू आहे. मोसमी वारे पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे दोन दिवस आहे तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

NIRF च्या रँकिंगमध्ये मद्रास आयआयटी सलग पाचव्या वर्षी अव्वलच

World Environment Day : या साध्या सोप्या गोष्टीतून देखील तुम्ही निसर्गाची हानी टाळू शकता

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी वेगवेगळी ‘मॉडेल्स’ वापरल्यामुळे वादळाची तारीख आणि क्षेत्र याबद्दल वेगवेगळी माहिती मिळते. त्यामुळे वादळ नेमके कोणत्या तारखेला येणार याविषयी निश्चित काही सांगता येणार नाही, असे हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी