30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रअर्धेअधिक कोकण पाण्याखाली; नद्या दुथडी भरून वाहतातहेत, गावांचा संपर्क तुटला

अर्धेअधिक कोकण पाण्याखाली; नद्या दुथडी भरून वाहतातहेत, गावांचा संपर्क तुटला

राज्यात सलग दोन दिवसापासून सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठाण्यापासून चिपळूणपर्यन्त अर्धे अधिक कोकण पाण्याखाली आले असून नद्या दुथडी भरून वाहतातहेत, गावांचा संपर्क तुटला आहे. ठाणे जिल्हा हा मुंबई, पालघर, रायगड, पुणे आदी जिल्ह्यांना जोडला गेला आहे. पण मुसळधार पावसामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल सेवा ही मुंबईला जोडणारी महत्वाची सेवा पण बुधवारी तीही कोलंयडून पडलेली आहे. कल्याण ते कर्जत दोन्ही बाजुंची रेल्वे वाहतूक बंद असून पॉईंट फेल झाल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली. पावसात रस्त्यात खड्डे पडल्याने मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी आहे. कोकणात पूरस्थिती असून रायगड, रत्नागिरी, चिपळूनमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. असे असताना, रायगडात ढगफुटी झालेली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पालघर – रायगडात शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. ठाणे शहरातही वसई-विरारमध्येही पुराचा धोका वाढला आहे. माळशेज घाटात दरड कोसळली असल्याने कल्याण-मुरबाड रस्ता बंद जरण्यात आला आहे. उल्हास, काळू धोक्याच्या पातळीवर वाहत असल्याने टीडीआरएफ – एनडीआरएफ जवान अलर्ट मोडवर मोडवर आहेत. मंगळवारी दिवशभर पडत असलेल्या पावसाने बुधवारीही उसंत घेतली नाही. पहाटे ठाणे आणि रायगडला पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर रायगडात अनेक तालुक्यांत महापुराची परिस्थिती निर्माण झाली. सुधागड, पेण, नागोठणे, वडखळ, रोहा, श्रीवर्धन अनेक ठिकाणी नद्यांना पूर येवून अनेक गावांचा संपर्क तुटला होता. उल्हास आणि काळु नदी धोक्याच्या पातळीवर आल्याने कल्याण-मुरबाड रस्त्यावर पावसाचे पाणी आले होते.

ठाणे शहरात सोसाट्याच्या वार्‍याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे मध्य रेल्वे अर्ध्या तास उशिराने धावत होती. ठाण्यातील मुख्य ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पाचपाखाडीत एका सोसायटीची 15 फुट सुरक्षा भिंत कोसळली. पालघरात मुसळधार पावसामुळे वसई-विरार आणि नालासोपारा शहरे पाण्याखाली गेली होती. सुरक्षेसाठी ठाणे आणि रायगडात अनेक ठिकाणी मंगळवार आणि बुधवारी काही भागांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. दरम्यान, 21 जुलैपर्यंत मुसळधार पावसाच्या इशार्‍यामुळे ठामपाचे टीडीआरएफ आणि केंद्राची एनडीआरएफची टीम अलर्ट मोडवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाणे शहरात वंदना, जांभळी नाका, भास्कर कॉलनी, घोडबंदर रोड, राम मारुती रोड परिसरात पाणी साचले. ठाण्यात बुधवारी सकाळ पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, अंतर्गत रस्ते यामुळे कोंडी झाली आहे. रस्त्यात वाहन बंद पडत आहे. तसेच रस्त्यात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. ठाण्यात तीन ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवर झाडे कोसळली असून यात नऊ वाहनांचे नुकसान झाले. ठाणे जिल्ह्यात बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 80.4 मीमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक अंबरनाथमध्ये 114.1 मीमी, उल्हासनगर 110.5 मीमी, कल्याण 98.6 मीमी, ठाणे 75.6 मीमी, भिवंडी 79.6, शहापूर 53.7 मीमी इतका दिवसभरात पाउस झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार

कल्याण- रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या सखल भागात पाणी साचले आहे. पहाटेपासून शहरातील बाजार गजबजून जातात. परंतु, मुसळधार पावसामुळे बाजारांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. फेरीवाले रस्त्यांवरुन गायब आहेत.उल्हास खाडी किनारी भराव टाकून बुजवलेल्या बेकायदा चाळींमध्ये पाणी घुसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अशा भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उल्हास, काळू नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. दरवर्षी मुसळधार पाऊस सुरू झाला की ज्या खाडी किनारच्या भागात महापुराचे पाणी घुसते. या भागातील रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे.

नद्याच्या पाणी पातळीत वाढ

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर बुधवारी पहाटेपर्यंत अखंडित सुरू होता. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बदलापूर शहर, कल्याण तालुका आणि उल्हासनगरातून वाहणार्‍या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. तर काळू नदी इशारा पातळीवर वाहते आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास झपाट्याने पाणी पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उल्हासनदीच्या जांभुळपाडा पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बदलापूर, मोहने, आंबिवली, बल्याणी, शहाडा परिसररात अलर्ट जारी करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षात उशिराने सुरू झालेला पाऊस जुलै महिन्यात बरसतो आहे. मंगळवारी भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मंगळावरपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळीनंतर पावसाचा जोर वाढला. मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी नद्या, नैसर्गिक आले दुथडी भरून वाहू लागले आहेत. रायगड जिलयातील पुंड लिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, काळू पालघर जिल्ह्यातील पिंजाळ, वैतरणा आदी नद्यांनी पाणी इशारा पातळी ओलांडली आहे. मंगळवारपासून ठाणे, रायगड आणि पालघरात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे 50 टक्क्यांच्या पुढे पोहोचली असून पालघरातील धामणी व मध्य वैतरणा 100 टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे.

हे सुद्धा वाचा:

उद्धव ठाकरे, अजित पवार भेटीने राजकीय चर्चांना उत

राज्यात पावसाची जोरदार हजेरी; रायगडसह पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट

ट्रिपल महाराष्ट्र केसरी ACP विजय चौधरी कॅनडाच्या आखाड्यात दाखवणार जलवा

धरण क्षेत्रात चांगला पाउस

मंगळवारपासून ठाणे, रायगड आणि पालघरात मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे 50 टक्क्यांच्या पुढे पोहोचली असून पालघरातील धामणी व मध्य वैतरणा 100 टक्के भरले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी