26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरमनोरंजनशिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा... राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

शिल्पाच्या नवऱ्याचा अजून एक कारनामा… राज कुंद्राने पॉर्नफिल्मबाबत केले वक्तव्य

बॉलिवूड दिवा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा चर्चेत आला आहे. पॉर्नसिनेमा बनवण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज कुंद्रा आता स्टँड-अप कॉमेडियन बनला आहे. स्वतःवरती विनोद करत अतिशय चलाखीने संपूर्ण वादावर प्रेक्षकांसमोर आपली बाजू मांडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज कोर्टकचेरीतून सुटल्यानंतर मीडियासमोर चेहरा झाकून फिरतोय. राज आता ‘मास्क मॅन’ म्हणून ओळखला जातोय. त्याच्या एकामागोमाग एक वादावर मिम्स तयार होत असताना राजने आता स्टॅन्ड अप कॉमेडियन बनून सर्वांचे मनोरंजन करतोय. राजच्या नव्या भूमिकेमुळे सर्वांनीच त्याची प्रशंसा केली आहे.

दोन वर्षांपूर्वी पॉर्न सिनेमा बनवल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा बराच काळ पुण्यातील तिहार तुरुंगात होता. या काळात तणावग्रस्त राज कुंद्राला प्रचंड मनःस्तापाला सामोरे जावे लागले. जामीन मिळताच राजचा रडवेला चेहरा तुरुंगाबाहेरील मीडियाकर्मीनी टिपला.

या घटनेनंतर बरेच महिने राज घराबाहेर पडला नाही. प्रदीर्घ काळ कुटुंबीयांसोबत घालवल्यानंतर राज बाहेर पडण्याअगोदर चेहरा झाकून फिरू लागला. विमानतळ, पार्ट्यामध्ये राज फोटोग्राफर्ससमोर येण्यापूर्वी संपूर्ण चेहरा झाकणारा मास्क वापरू लागला. अखेरीस मीडियाकर्मीनी राजला ‘मास्क मॅन’ असे नाव दिले.

नुकत्याच पार पडलेल्या गणपती उत्सवाचदरम्यान घरातील दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाप्रसंगीही राजने सर्वांसमोर चेहरा झाकला होता. दिवसेंदिवस राज चेष्टेचा विषय बनत चालला असताना एके दिवशी राजच्या वादग्रस्त जीवनावर चित्रपट येत असल्याची बातमी झळकली. खुद्द राज या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

अभिनयाचा ग, म, भ, न माहित नसलेल्या राजने चित्रपटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वचजण अवाक झाले. दोन दिवसांपूर्वी राज व्यासपीठावर ‘मास्क मॅन’ बनतच तरुणांसमोर स्टॅन्ड अप कॉमेडीसाठी उभा ठाकला.

हे ही वाचा 

नुशरत युद्धभूमी इस्त्रायलमधून सुखरूप पोहोचली भारतात

इटलीत दीपिका आणि हृतिक एकत्र? फोटोतून आलं सत्य समोर…

तब्बल ३२ वर्षानंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत एकत्र झळकणार मोठ्या पडद्यावर!

मी बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी लैंगिक विनोदावर आपत्ती असणाऱ्यांनी कृपया दहा मिनिटांसाठी बाहेर जा, अशी नम्र विनंती केली. या विनंतीवर शांतता राखत सर्वजण जागच्याजागीच थांबले. यावर थक्क झालेल्या राजने मिश्किल शैलीत तुम्ही सर्वजण ठरकी असल्याचे सांगताच सर्वचजण हसू लागले. मी वयाच्या अठराव्या वर्षी लंडनमध्ये टॅक्सी चालवत स्वतःची गुजारण केली. व्यवसायासाठी कपड्यांचा बिझनेस केला. जो माणूस कपडे चढवतो तो काढेल कसा असा प्रश्न राजने सर्वांसमोर उपस्थित केला. राजच्या वक्तव्यावर सर्वांनीच दाद दिली. राजच्या स्टॅन्डअप कॉमेडीचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होऊ लागला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी