29 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमहाराष्ट्रमोदीजी, फक्त गुजरातकडेच नाही इतर राज्यांकडेही लक्ष द्या!

मोदीजी, फक्त गुजरातकडेच नाही इतर राज्यांकडेही लक्ष द्या!

फॉक्सकॉन वेदांता कंपनीचा १ लाख ५८ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे वळविण्यात आल्यानंतर प्रचंड रोजगारनिर्मिती क्षमता असलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटलाच कसा? असा रोकडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर घटनेच्या विरोधात जाऊन केवळ एकाच राज्याला महत्व दिलं जात आहे असे वाटत नाही का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला असता त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यकडे लक्ष दिले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत म्हणून केवळ गुजरातलाच प्राधान्य देणे हे नरेंद्र मोदींना (Narendra Modi)शोभत नाही.” पुणे येथे रविवारी झालेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मी हे यापूर्वीच बोललो होतो, पण त्यावेळी सर्वांचा शाहंमृग झाला होता, असे सांगत विरोधकांनाही टोला लगावला. (Raj Thackeray Criticize Prime Minister Narendra Modi; he should take care of all states)

हे सुद्धा वाचा

आता कार्यालयातही बिनधास्त झोपा!

शिवरायांचे राज्य कुटुंबाच्या नावाने नव्हते; रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य होते : शरद पवार

मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगा: आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातमध्ये गेल्याबाबत राज ठाकरे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, “महाराष्ट्र हे सर्वार्थाने श्रीमंत राज्य आहे. एखाद दुसरा उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्याला फरक पडत नाही. पण म्हणून सर्वच मोठे उद्योगधंदे गुजरातमध्ये नेणे पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. याआधीचे पंतप्रधान मनमोहनसिंग हे पंजाबचे होते त्यांनी फक्त पंजाबीपुरताच विचार केला का? भविष्यात आसाममधील कोणी पंतप्रधान झाल्यास त्यानेदेखील तसेच करावे का?” भारत हा एकसंध देश आहे हे केवळ बोलण्यापुरताच असते का? हाच का तुमचा एकसंधपणा? असे खोचक सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातप्रेमाचा समाचार घेतला.

… यासाठीच लाव रे तो व्हिडीओ सुरु केलं
“२०१४ ची माझी भाषणं तुम्ही ऐकली तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारकडे लक्ष द्यावे,” असे मी म्हंटले होते. यासाठीच तुम्ही “लाव रे तो व्हिडिओ” सुरु केले होते का अशी विचारणा केली असता राज ठाकरे यांनी २०१४ नंतर सत्तापालट झाल्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यातील अनेक गोष्टी मला पटल्या नाहीत. यासाठीच “लाव रे तो व्हिडिओ” मी सुरु केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. पण जर का त्या व्यक्तीने चांगली गोष्ट केली तर त्याचे अभिनंदन करण्याइतका मनाचा मोठेपणाचा तुमच्याजवळ असावा लागतो. काश्मीरमधील कलाम ३७०, राम मंदिरचे प्रकरण सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्याचे मी अभिनंदनही केले, अशी प्रतिक्रिया राज यांनी यावेळी दिली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी