29 C
Mumbai
Friday, May 19, 2023
घरमहाराष्ट्रआताच विधानसभेच्या निवडणूका लावा, काय तो सोक्षमोक्ष लागू दे; राज ठाकरे कडाडले

आताच विधानसभेच्या निवडणूका लावा, काय तो सोक्षमोक्ष लागू दे; राज ठाकरे कडाडले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच शिंदे फडणवीस सरकरला टोले लगावत त्यांनी विधानसभा निवडणूक होऊन जाऊद्या असे आव्हान देखील दिले. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा मोठ्या महत्त्वकांक्षा नव्हत्या. आज जी परिस्थिती निर्मान झाली आहे, अशावेळी मला अनेक गोष्टी तूम्हाला सांगायच्या आहेत. आज जे राजकारण सुरू आहे ना ती बाळासाहेब असते तर होऊ दिली असती का? सहानुभूतीसाठी याने हे केले त्याने ते केले हे सांगत फिरायचे, तुम्ही काय शेण खाल्ल होतं का, असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. (Raj Thackeray’s Speech at Shivaji Park is MNS’s Gudipadwa melawa)

सन २०१९ साली निवडणूकीची आकडेवारी आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सांगितले शिवसेनेचा मुख्यमंत्री करा असे सांगितले. उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहा म्हणाले चार भिंतीत सांगितले. मात्र सभांमध्ये पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असे शहा सांगत होते, तेव्हा का तुम्ही शांत होता असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. निवडणूकीनंतर ज्यांच्याविरोधात निवडणूक लढविली त्यांच्या विरोधात सत्ता स्थापन केली. त्याआधी अजित पवार यांनी भाजपसोबत शपथविधी घेतला. एप्रिलमधील सभेत मी बोललो. जूनमध्ये अलीबाबा आणि त्यांच्यासोबत ४० जण गेले, त्यांना चोर म्हणत नाही कारण ते चोर नव्हते. कोरोना काळात ते कोणाला भेटत नव्हते. आता अचानक बाहेर पडले आहेत.

२१ जून ला कळाले एकनाथ शिंदे सुरतला गेले, तेथून गुवाहाटीला गेले, मला आजपर्यंत एवढ माहिती होत महाराज सुरतेची लूट करुन आले, एकनाथ शिंदे महाराष्ट्र लूटून सुरुतला गेले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून एवढच सांगायचे आहे, मुख्यमंत्री म्हणून कारभार करा, उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली कि त्यांच्या मागे सभा घेणे हा कार्यक्रम नको. सध्या अनेक प्रश्न आहेत. पेंशनचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली काय सुरु आहे. संध्याकाळी लायटींग पाहिले की वाटते डान्सबार आहे का असे वाटते. सुशोभीकरणाच्या नावाखाली १७ कोटी खर्च केले.

राज ठाकरे म्हणाले, ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची आज वेळ आली आहे. आज महाराष्ट्र चाचपडतोय. नवे उद्योग येताना दिसत नाहीत. बोरोजगारी आ वासून उभी आहे. शेतकरी, कष्टकरी सरकारकडे पाहत आहेत. आणि सरकार कोर्टाकडे पाहत आहे, असे सरकार मी पाहिले नाही. मी तर म्हणतो आताच विधानसभेच्या निवडणूका लावून टाका. जो काय चिखल केलाय तो नागरिकांनी तोंडात घातला नाही तर बघा.

मला लोकांनी विचारले, तुमची हिंदूत्त्वाची व्याख्या काय आहे, माझ्या हिंदूत्वामध्ये मला धर्मांध हिंदू नको मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला माणसे हवीत, मुस्लीम धर्मातील देखील माणसे हवी आहेत, मला जावेद अख्तर यांच्यासारखी माणसे हवीत, पाकिस्तानात जावून खडेबोल सुणावणारी मला अपेक्षित असलेला मुसलमान कसा हवा, पाकिस्तानला सुनावणारा मुसलमान मला हवा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीचे अतिक्रमण काढल्याबद्दल अभिनंदन. शिंदे तुमच्याकडे शिवसेनेचे चिन्ह आले आहे, पण मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा आमचे कार्यकर्ते त्याकडे लक्ष घातलील. मध्यंतरीच्या काळात आमच्या मनसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, असे राज ठाकरे म्हणाले.

गेल्या दोन अडीच वर्षात सुरु झालेली एक गोष्ट महाराष्ट्र सरकारला सांगायची आहे. मध्यंतरी मला समुद्रात लोक दिसले, मी एकाला सांगितले जरा पहा, एकाने ड्रोन वरुन शुटींग करुन काही क्लीप माझ्याकडे आणल्या. तुमच्या भागात देखील तुम्ही दक्ष असले पाहिजे. जो या देशाची घटना मानणारा मुसलमान आहे त्यांना मला विचारायचे आहे, हे तुम्हाला मान्य आहे का असे विचारत राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवला. यावेळी शिंदे-फडणवीस यांना मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल, पोलिस कमिशनर फणसाळकर यांना देखील सांगणे आहे, यावर तुमची कारवाई झाली नाही तर जे काय होईल ते तुम्हाला सांगेन. असे म्हणत राज ठाकरे यांनी व्हिडीओ दाखवला. त्या व्हिडीओत माहिमच्या समुद्रात अनधिकृत रित्या दर्गा उभारला जात असल्याचा व्हिडीओ त्यांनी दाखवला. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आव्हान दिले की, जर हे महिनाभरात तोडले नाही तर त्याच्याच बाजूला मोठं गणपतीचे मंदीर उभारणार असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.

हे सुद्धा वाचा
देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार ? निवडणूक प्रतिज्ञापत्र खटल्याचा लवकरच निकाल

अन् मुख्यमंत्री शिंदे थेट मनसे कार्यालयात; राजकीय चर्चेला उधान!

उत्साहाची गुढी ! अवघ्या महाराष्ट्रात आनंदाची शोभायात्रा; पाहा फोटो

राज ठाकरे म्हणाले, हे राज्य जर माझ्या हातात आले तर सुतासारखे सरळ करेन, परत कुणाची हिंमत होणार नाही. महाराष्ट्रातील मुसलमान समाजाला तरी हे मान्य आहे, का अनधिकृत दर्गा उभा करायचा हे तुम्हाला मान्य आहे का ? राज्यकर्ते जेव्हा इतरगोष्टीत गुंततात तेव्हा बाहेरचे लोक काय करतात हे दाखवले. येणारी रामनवमी उत्साहात साजरी करा. शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करा, ६ जून ला मी स्वत: रायगडावर जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोकणात एप्रिलमध्ये दोन सभा घेणार असल्याचे देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी