31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाही का? राजा माने यांचा सरकारला सवाल

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाही का? राजा माने यांचा सरकारला सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर खूप लोकांची मागणी पूर्ण केली. यातच आता संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. (Raja Mane's question to the Eknath Shinde government)

महाराष्ट्रातील सरकारने आतापर्यंत खूप मोठं-मोठे  निर्णय घेऊन लोकांचे मन जिंकण्याचा पर्यंत केला. सरकार त्यांच्या प्रयत्नात यशस्व देखील झाले. मात्र, एका गोष्टीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. ते म्हणजे राज्यातील पत्रकार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजवर खूप लोकांची मागणी पूर्ण केली. यातच आता संपादक, माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)

Maharashtra Assembly Election 2024: अमित शहा यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना दिला मोलाचा सल्ला!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडके नाहीत काय, असा सवाल राजा माने केला आहे. तसेच, पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि डिजिटल मीडिया संदर्भात धोरण जाहीर करण्याची मागणी देखील केली आहे. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)

हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार का ? | ऐका त्यांच्यात तोंडून

संघटनेच्यावतीने राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांना पाठविलेल्या निवेदनात राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या डिजिटल मीडिया धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडिया धोरण तातडीने जाहीर करून डिजिटल पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)

  • डिजिटल माध्यमांना शिस्त लावताना पत्रकारितेचे निकष ठरवून नोंदणी प्रक्रिया करण्यात यावी.
  • राज्यातील पत्रकार अधिस्वीकृती नियमात बदल करण्यात यावे.
  • पत्रकार सन्मान योजनेत वीस हजार करण्याच्या विधीमंडळात झालेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.
  • ज्येष्ठ पत्रकारांचे सन्मान योजनेत वेगवेगळ्या जाचक अटींमुळे प्रलंबित असलेले अर्ज तातडीने मंजूर करावे.

राजस्थान सरकारने गेल्यावर्षी जून महिन्यात राज्यातील न्यूज पोर्टल्स, यूट्यूब चैनल्ससह डिजिटल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवरील पत्रकारांसाठी नोंदणी व्यवस्था केली. विविध पाच वर्ग तयार करून त्या वर्गवारी नुसार जाहिरात वितरणाची व्यवस्था केली. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)

तसेच, 28 ऑगस्ट 2024 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांसाठी डिजिटल मीडिया धोरण जाहीर केले. (Raja Mane’s question to the Eknath Shinde government)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी