33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रगावठी दारुसाठी प्रसिद्ध असलेले राजापूर जलसमृध्द बागायती गाव झाले!

गावठी दारुसाठी प्रसिद्ध असलेले राजापूर जलसमृध्द बागायती गाव झाले!

ओसाड, दुष्काळी राजापूर गाव पूर्वी गावठी दारूसाठी प्रसिध्द होते. दुरवरून लोक रसपान करण्यासाठी यायचे. परंतु, २०१५ पासून राजापूरकरांनी दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी जलसंधारणाला सुरुवात केली आणि अल्पावधीत दर्जेदार शेती उत्पादने घेवून एक जलसमृध्द बागायती गाव अशी नवी ओळख निर्माण केली, अशा शब्दात माजी विभागीय आयुक्त व रयत विदयापीठाचे कुलाधिपती चंद्रकांत दळवी यांनी राजापूर (ता. खटाव, जि. सातारा) गावचा गौरव केला.

राजापूर (ता. खटाव) येथे वीज महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता अंकुशराव घनवट यांचा सेवानिवृती समारंभ तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राजापूर गाव पाणीदार करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेल्या सर्वोच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी राजापूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या ऋणनिर्देश सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पुणे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता दिलीप प्रक्षाळे, ठाणे महसूल विभागाचे डेप्युटी कमिशनर नासिर मणेर, डॉ. अरूणा बर्गे, कोरेगाव पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, नाम फौंडेशनचे बाळासाहेब शिंदे, जितेंद्र शिंदे संतोष महाडीक, श्री. काटकर, चैत्यन्य जोशी, कृषी अधिकारी सचिन लोड कृषी पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, भूजलतज्ञ विलास भोसले, लक्ष्मण चव्हाण, दत्ता केंजळे, अमृत काळोखे, माजी सरपंच हणमंत घनवट, जोतीराम घनवट, नाम व सत्व फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अंकुश घनवट यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कराडियन्स ८७ ग्रुपचे सदस्य तसेच विद्याथ्र्यांनी विविध भेटवस्तू देवून घनवट यांचा सत्कार केला.


दळवी म्हणाले, गावोगावी विकासकामासाठी लोक आसुसलेले असतात. गरज असते ती अंकुश घनवट यांच्यासारख्या एखाद्या चळवळ्या व्यक्तीने पुढाकार घेण्याची इतर गावांना हेवा वाटावा असा सतराशे हेक्टरचा पाणलोट राजापूरला लाभला आहे. डोंगरदऱ्यानी केला. व्यापलेला हा भाग वास्तविक शापच आहे, परंतु त्याकडे संधी म्हणून पाहून गेल्या सात आठ वर्षांत राजापूरकरांनी त्याचे वरदानात रूपांतर केले.

हे सुद्धा वाचा

गोगावलेंचे प्रतोदपद बेकायदा ठरवल्याने ठाकरेंच्या आमदारांना बळ

कमी CIBIL स्कोअरवरही हमखास कर्ज मिळू शकते; जाणून घ्या एका क्लिकवर

पाहुणं जेवला का? म्हणताचं 25 लोक शेडसोबत कोसळले; गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

राज्यात गेल्या ५० वर्षात पाझर तलाव, नालाबंडींग, माती नालाबांध अशी जलसंधारणाची प्रचंड प्रमाणात कामे झाली. मात्र जुन्या काळात बांधलेल्या कोणत्याच स्टक्चरमध्ये पाणी टिकत नाही. पाझर तलावांची गळती काढण्याची कामे आज अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे शासनाचा सारा वाया गेला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी झालेली कामे गुणवत्तापुर्वक झाली असती तर आज ही वेळच आली नसती, अशी वस्तुस्थिती दळवी यांनी समोर आणली. यावेळी बोलताना ते म्हणाले दुष्काळी गावाला पाणी उपलब्ध झाले म्हणून त्याचा सातत्याने बेसुमार उपसा केला तर पुन्हा त्या गावाची चाळण व्हायला आणि गाव दुष्काळामध्ये परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी