बुधवारी रक्षाबंधनानिमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना पंडितांनी महिलांना ठराविक मुहूर्ताच्या वेळेत भावांना राखी बांधण्याचा सल्ला दिला आहे. बुधवारी 30 ऑगस्ट रोजी भद्रा योग असल्याने ठराविक मुहूर्ताच्या काळातच बहिणींनी भावाला राखी बांधावी, असा सल्ला पंडितांनी दिला आहे. भद्रा योग राखी बंधनासाठी अशुभ असतो, अशी धारणा आहे.
रक्षाबंधन 30 ऑगस्ट रोजी बुधवारी साजरी करण्याबद्दलही बराच गोंधळ आहे. बुधवारी पूर्णिमा तिथी असल्याने दिवसभर भद्र योग आहे. बरेच का होलिका दहन आणि रक्षाबंधनाच्या दिनी भद्रा वेळ असते. होलिका ध्यानाच्या वेळी भद्रा वेळ असेल तर होलिका दहन पुढे ढकलली जाते. यंदा श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेत भद्रा योग असल्याने बुधवारी रक्षाबंधन रात्री उशिरा साजरी करणे योग्य ठरेल, असे पंडितांनी सुचवले.बुधवारी सकाळी 10 वाजून 13 मिनिटानंतर ते संध्याकाळी 8 वाजून 27 पर्यंत रक्षाबंधन साजरी करणे उचित ठरणार नाही. बुधवारी 9 वाजून 2 मिनिटानंतर बहिणींनी भावांना राखी बांधून घ्यावी. गुरुवारी सकाळीही रक्षाबंधनासाठी चांगला मुहूर्त आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात पूर्वी काही मिनिटांसाठी बहिणी भावाला राखी बांधू शकतात.
पुरोहित विलास कुलकर्णी काय म्हणतात…
दरम्यान रक्षाबंधन बुधवारी दिवसभरात केव्हाही करू शकतो. राखी पौर्णिमाचा भद्रा चा काहीही संबध नाही. त्यामुळे मनात कोणताही विचार न करता रक्षा बंधन चा सण दिवसभरात केव्हाही उत्साहात साजरा करावा. व भावाला राखी बांधावी असा सल्ला पुरोहीत विलास कुलकर्णी यांनी दिला आहे.
पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते. रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते. रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे. त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई. पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी हे स्वरूप त्याला आले. परंतु आजकाल अनेक जन नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. व सगळा गडबड गोंधळ उडवून टाकत आहेत आजकाल जी राखी पौर्णिमा साजरी केली जाते तो एक लौकिक विधी आहे. म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला दोरा बांधण्याचा एक विधी आहे. त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही. त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सर्वांनी आपले सण आनंदाने साजरे करावेत असेच धर्मशास्त्र सांगते. पण आजकाल हे व्हाट्सअप आल्यापासून खूप विचित्र मेसेज फॉरवर्ड होत आहेत. आज काल भद्रा दोष सांगितला जातो, वास्तविक दर वर्षीच राखी पौर्णिमेला भद्रा असतेच मग इतके दिवस आपले पूर्वजांनी कोणतेही बंधने आपल्याला सांगितलेली नाहीत. ते वेडे होते का ?
आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत, त्यामागचा उद्देश काय आहे. आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत. दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो. त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात असे कुठेही उल्लेख नाहीत हे मी माझ्या खात्रीने व विश्वासाने सांगू शकतो.
रक्षाबंधनासाठी थाळी ‘या’ पारंपारिक पद्धतीने सजवा
रक्षाबंधनासाठी थाळी आधी स्वच्छ धुऊन घ्या. थाळी सुक्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर हळद कुंकू लावून घ्या. थाळीत तुपाचा दिवा असावा. थाळीत तांदूळ, एक सुपारी, हळद कुंकू, राखी आणि मिठाई असावी.
रक्षाबंधन सुरू करण्यापूर्वी
भावाला आसन म्हणून लाकडाच्या पाटावर बसवून घ्यावे. भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसण्यास सांगा. राखी बांधताना बहिणीने ओढणी किंवा भावाने डोक्यावर टोपी घालावी. भावाच्या हातावर राखी बांधताना दोघांनीही देवाचे स्मरण करावे.
हे सुद्धा वाचा
नीरजच्या आईने जिंकली करोडो भारतीयांची मनं, पाकिस्तानी खेळाडुबद्दलचं व्यक्तव्य चर्चेत
रक्षाबंधनाला बहिणीला द्या आयुष्यभर सुखी ठेवणारी ‘ही’ भेटवस्तू
बाजारपेठेत चांद्रयान आकाराच्या राख्या; किंमत पाहून व्हाल थक्क !
भावांसाठी
रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू जरूर द्यावी. बहिणीच्या पदरात लाल पिवळ्या किंवा सफेद कापडाने बांधलेला तांदूळ जरूर द्यावा. बहिणीला नमस्कार करून,घेण्यास विसरू नक तिचे आशीर्वाद घेण्यास विसरू नका.
सध्या बाजारात अत्याधुनिक भेटवस्तू उपलब्ध आहेत. सौंदर्यप्रसाधने, कपडे, खाद्यपदार्थ याऐवजी बहिणीच्या पाठी भक्कमपणे उभे राहणार, असे आश्वासन द्या. बहिणीच्या संकटकाळात तिला हव्या असलेल्या गोष्टींबाबत सातत्याने माहिती घ्या. बहिणीच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अगोदरच योग्य तजवीज करून ठेवा.