चंद्रयानाच्या घवघवीत यशानंतर बाजारात यंदा चंद्रयान राखी उपलब्ध झाल्या आहेत. या राख्यांना बाजारात प्रचंड मागणी असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले. त्यासह स्टोन, कुंदन, रेशम आदी राखीही मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. बाजारात पाच रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत राखी उपलब्ध आहेत. लहान मुले कार्टूनची राखी खरेदी करत आहेत. रक्षाबंधनानिमित्ताने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याने पार्लरपासून ते मेहंदी पर्यंतच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
यंदा बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. गेल्या आठवड्यात अंतराळयानातील महत्त्वकांक्षी मोहीम समजल्या जाणाऱ्या चंद्रयान3 ने चंद्रावर यशस्वी पदार्पण केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरला. भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. ही ऐतिहासिक घटना ताजी असतानाच बाजारात विकेंडपासून चंद्रयानाच्या राख्या दाखल झाल्या आहेत. चंद्रयानाच्या राखीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदिंचा फोटो, इस्त्रोचा फोटोदेखील उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा
यंदा देशात राखीच्या विक्रीत होणार एवढी मोठी उलाढाल!
रितेशच्या स्वप्नात लग्नानंतरही जिनिलिया… पाहा गमतीशीर व्हिडिओ
ठाकरेंच्या दबावामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली; नितीश राणे यांचा आरोप
फक्त चंद्रयानची प्रतिमा असणाऱ्या राखीही बाजारात सोमवारपासून उपलब्ध झाल्या आहेत. राखी आर्टिस्टग्रुपने शुक्रवारपासून देशभरातील विविध बाजारात चंद्रयानाच्या आकाराच्या राखी उपलब्ध करून दिल्या आहेत. चंद्राचा आकार असलेल्या राखीची किंमत 35 रुपयांनी उपलब्ध आहे. चंद्रयान लँडर मॉडेलसह बाजारात उपलब्ध असलेली राखी थेट 1 हजार 200 रुपयांच्या घरात आहे.