28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रRamdas Kadam : 'तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र ना मग तुमच्या स्वत:मध्ये काही कर्तृत्त्व...

Ramdas Kadam : ‘तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र ना मग तुमच्या स्वत:मध्ये काही कर्तृत्त्व आहे की नाही?’

खरंतर शिवसेना आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले असून वाद शमण्याचे कुठेच चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे यापुढे शिवसेना आणि शिंदेसेनेचं नेमकं भविष्य काय याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेतील अनेक रथी – महारथी शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेतील जुन्या जाणत्या नेत्यांना सुद्धा उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे अधिक जवळचे वाटू लागले आणि शिवसेना वि. शिंदेसेना असा वाद सुरू झाला. रामदास कदम हे जुन्या शिवसैनिकांच्या फळीतील एक नाव जे शिंदे गटाची आज पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. दरवेळी शिवसेनेकडून वगळ्याची भावना व्यक्त करीत ठाकरेंवर ते जोरदार हल्लाबोल करत शिवसेनेने आतापर्यंत दुर्लक्ष केल्याचे दुःख व्यक्त करत असतात. यावेळी सुद्धा कदम यांंची जीभ घसरली असून त्यांनी वयक्तिकरीत्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर सडकून टीका केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिंदे गटातील नेते रामदास कदम हे रविवारी दापोलीत येथे आयोजित एका सभेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी वयक्तिकरीत्या टीका करत त्यांचा उद्धार केला. रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे हे सतत ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे’ असे सांगत असतात. ही गोष्ट त्यांनी किती वेळा सांगावी. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असण्याबद्दल तुम्हाला संशय आहे का, असा सवाल करताना रामदास कदम यांची जीभ घसरली.

आक्षेपार्ह वक्तव्य सुरूच ठेवत रामदास कदम म्हणाले, शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा केलेला नाही. अनेक शिवसैनिकांचे खून झालेत, अनेकजण जेलमध्ये गेलेत, अनेक शिवसैनिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तेव्हा ही शिवसेना मोठी झाली आहे. यामध्ये तुमचं योगदान काय आहे, असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. उद्धव ठाकरे केवळ मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, हे वारंवार सांगत असतात. अरे पण ही गोष्ट कितीवेळा सांगाल. त्याबद्दल कोणाला संशय आहे का? असा सुद्धा मिश्किल टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा…

Raj Thackeray : विलासरावांच्या दुर्लक्षामुळे बीएमडब्ल्यूचा प्रकल्प तामिळनाडूला गेला, आता फॉक्सॉन गुजरातला का गेला याची चौकशी करा- राज ठाकरे

Arvind Sawant : ‘यांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं…’, अरविंद सावंताचा कडवा सवाल

ST Bus Crises : ‘लालपरी’ला लागली शिंदे सरकारची नजर, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुढे रामदास कदम म्हणाले, हो, हो तुम्हीच बाळासाहेबांचे पुत्र आहात, आम्ही कधी नाही म्हटलंय का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहातच ना. पण त्यांचे नाव वारंवार का घ्यावे लागते. तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्त्व आहे की नाही, असा तिखट सवाल सुद्धा कदम यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान केवळ उद्धव ठाकरेच नाही तर त्यांनी रश्मी ठाकरेंवर सुद्धा वयक्तिकरीत्या टीका केली आहे. यावेळी बोलताना कदम म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या, रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या असा गंभीर आरोपच त्यांनी यावेळी केला.

माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत असे म्हणून रश्मी ठाकरे यांच्या राजकीय सहभागाबद्दल रामदास कदम यांनी ताशेरे ओढले आहेत. पुढे कदम म्हणाले, मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते असा सुद्धा धडधडीत आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे परंतु यावर प्रत्युत्तर देत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना चांगलेच फटकारले आहे.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, रामदासभाई, आपण आज जी भाषा वापरली, त्या पातळीला उतरून आम्ही बोलणार नाही. कारण आमच्यावर आमच्या नेतृत्त्वाचे आणि कुटुंबीयांचे संस्कार आहेत. बाळासाहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं नाव वजा केल्यास आयुष्यात किती पदं मिळवू शकला असता?, हे तुमच्या अंतर्मनाला विचारा, असे म्हणून अंधारेंनी रामदास कदमांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. खरंतर शिवसेना आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले असून वाद शमण्याचे कुठेच चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे यापुढे शिवसेना आणि शिंदेसेनेचं नेमकं भविष्य काय याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी