29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रजयकुमार गोरे आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये : रासप नेते शिवाजी बरकडे

जयकुमार गोरे आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये : रासप नेते शिवाजी बरकडे

बिजवडी येळेवाडी रस्त्याच्या कामावरुन माण तालुक्यात श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. तालुक्याचे भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी या रस्त्याच्या कामाचे श्रेय न घेता सुसंस्कृत राजकारणास चुकीचे वळण न देता ज्याच्या त्याच्या कामाचे श्रेय ज्याला त्यालाच घेऊ द्यावे, अन्यथा आपल्या कामातही इथून पुढे ढवळाढवळ केली जाईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते शिवाजी बरकडे यांनी दिला आहे, ते पुढे म्हणाले बिजवडी येळेवाडी हा रस्ता खर म्हणजे आमदार महादेव जानकर यांच्या प्रयत्नांतूनच मंजूर झाला असून यामध्ये भाजपच्या नेत्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, असा सणसणीत टोला आमदार जयकुमार गोरे यांना रासप नेते शिवाजी बरकडे यांनी लगावला आहे.

येळेवाडी ग्रामपंचायतीने महादेव जानकर यांच्याकडे ग्रामपंचायत ठराव दिला होता. त्यावेळी आमदार जानकर यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करून तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केला आहे. यामध्ये तालुक्यातील सत्ताधारी प्रतिनिधी व इतरांनी स्वतःचा स्वार्थ साधत स्वतः रस्ता मंजूर केल्याचा खोटा आव आणू नये, असेही ते यावेळी म्हणाले.
येळेवाडी ग्रामपंचायत ही लहान असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देता येत नाही. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम हे दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले. फडणवीस सरकार कोसळल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उर्वरित कामास मंजुरी देऊन नऊ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे दुसऱ्याच्या कामात तालुक्यातील लोक प्रतिनिधींनी ढवळाढवळ न करता इतरांच्या विकास कामाचे श्रेय न घेता आपापली कामे व्यवस्थितरित्या करण्यावर लक्ष द्यावे,असा सल्लाही शिवाजी बरकडे यांनी यावेळी दिला.
हे सुद्धा वाचा

आमदार जयकुमार गोरे यांनी बिजवडी-येळेवाडी रस्त्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये : प्रशांत विरकर

जस्टिन बीबरची पत्नी हेली बीबरला धमक्या, सेलेना गोमेझचा खुलासा

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भव्य वास्तूचे सोमवारी राज्यपालांच्या हस्ते भूमिपूजन

सदरच्या रस्त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली असतानाच या रस्त्याचे लोकार्पण आमदार जानकर, पंकजा मुंडे व अजित पवार यांच्याहस्तेच होणार असल्याचे बरकडे यांनी सांगितले. रस्त्यासंदर्भात चाललेली दिशाभूल लक्षात घेता इथून पुढे सामान्यांची दिशाभूल करणाऱ्यास जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यामुळे येळेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व तालुक्यातील निष्क्रिय पुढाऱ्यांनी आपली पात्रता तपासूनच बोलावे.गाढवाला बाशिंग बांधले म्हणजे तो घोडा होत नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी बरकडे यांनी आमदार गोरे यांना लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी