32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रRatnagiri News : खोल समुद्रात जहाज बुडाले, 19 जण सुखरूप

Ratnagiri News : खोल समुद्रात जहाज बुडाले, 19 जण सुखरूप

सदर 'एम टी पार्थ' नावाचे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. ज्यावेळी तेलवाहतूक करणारे जहाज बुडू लागले त्यावेळी जहाजातून मदतीसाठी संदेश पाठवण्यात आला आणि काही मिनिटांच्या आत सागरी बचाव समन्वय केंद्र मुंबई त्यांच्या मदतीस धावून गेले

पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय तेलवाहतूक करणाऱ्या जहाजाला बंगलोरच्या दिशेने जात असताना अचानक जलसमाधी मिळाली. या जहाजामध्ये एकूण 19 जण होते. तटरक्षक दलाच्या प्रसंगावधाने या सगळ्याच जणांचे जीव वाचवण्यात यश आले आहे, परंतु जहाज बुडाल्याने दूरदूर पर्यंत तेलाचे तवंग दिसून येत आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. काळजाचा ठोका चुकवणारी अशा घटनेत सुदैवाने कोणतीच जीवीतहानी झालेली नाही त्यामुळे सगळ्यांनी एक सुटकेचा निश्वास टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेल्या किनाऱ्यापासून तब्बल 41 मैल लांब पश्चिमेला खोल समुद्रात एक तेलवाहतूक करणारे जहाज बुडत असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाला मिळाली. तटरक्षक दलाने शिताफिने प्रसंगावधान दाखवत लगेचच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या जहाजात एकूण 19 जण होते, त्यातील 18 जण भारतीय तर एकजण इथिओपियन असे मास्टरसह 19 जणांचा यात समावेश होता. जहाज बुडत असल्याने या सगळ्याच जणांचे जीव वाचवण्याचे काम तटरक्षक दलाने केले आहे.

हे सुद्धा वाचा…

UIDAI : युआयडीएआय लवकर आधारमध्ये काही बदल करण्याची शक्यता

Pakistan : पाकिस्तानचा जलद गती गोलंदाज लंडनमध्ये स्वखर्चाने उपचार घेतोय

Richest Man in the world : चर्चा तर होणारच! गौतम अदानी जगात ठरले दुसरे श्रीमंत व्यक्ती

सदर ‘एम टी पार्थ’ नावाचे जहाज यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जात होते. ज्यावेळी तेलवाहतूक करणारे जहाज बुडू लागले तेव्हा जहाजातून मदतीसाठी संदेश पाठवण्यात आला आणि काही मिनिटांच्या आत सागरी बचाव समन्वय केंद्र मुंबई त्यांच्या मदतीस धावून गेले असे या घटनेबाबत दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हे तेलवाहू जहाज दुबईहून न्यु मेंगलोरच्या दिशेने जात असताना अचानक जहाजाच्या तळाला भोक पडले आणि जहाजात पाणी भरू लागले, त्यामुळे देवगड किनाऱ्यापासून चाळीस नोटिकलमध्ये असतानाच हे जहाज बुडायला लागले.

तेलवाहतूक करणाऱ्या जहाजाकडून जेव्हा मदतीसाठी फोन आला तेव्हा ICGS सुजीत आणि ICGS अपूर्वा असे तटरक्षक दलाचे दोन जहाज त्यावेळी तिथे गस्त घालत होते, ते तातडीने अपघातग्रस्त जहाजाकडे वळविण्यात आले. अॅस्फाल्ट बिटुमेन 3911 एमटी वाहून नेणाऱ्या या जहाजाला भोक पडल्याचे लक्षात येताच तात्काळ जहाजावरील क्रूने ते जहाज सोडले आणि त्यावेळी तटरक्षक दलाने वेळेत पोहोचत सगळ्यांना अगदी सुखरूपपणे परत आणले आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी