34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकासवछाप मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीला वेग मिळणार, मंत्री रवींद्र चव्हाणांनी अधिकाऱ्यांना खडसावले !

कासवछाप मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रगतीला वेग मिळणार, मंत्री रवींद्र चव्हाणांनी अधिकाऱ्यांना खडसावले !

गेल्या दशकभरापासून कासवगतीने सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या  कामामुळे कोकणवासीयांमध्ये कमालीची संतापाची भावना आहे. समृद्धी महामार्गाचे काम केल्या सरकारच्या काळात सुरू होऊन नुकतेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण देखील झाले. मात्र मुंबई-गोवा महामार्गाबाबत (Mumbai-Goa highway) मात्र सरकारी अनास्थेमुळे हा महामार्ग म्हणजे ‘कासवछाप’ असल्याची टीका कोकणवासीयांमधून होत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मात्र आता या कामात लक्ष घातले असून या महामार्गाची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत अशी तंबीच त्यांनी अधिकारीवर्गाला दिली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडल्यामुळे या महामार्गावर प्रवास करतना प्रवासी, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी होत आहेत. त्यामुळे मंत्री रविंद्र चव्हाण यांनीच आता या कामात लक्ष घातले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करून जनतेला दिलासा द्यावा असे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.२, आदि रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे मजबूतीकरण व चौपदीकरणचे कामच्या सदयस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला. ही सर्व कामे तांत्रिकदृष्टया कशा पध्दतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.
हे सुद्धा वाचा

Mumbai Rain : PWD मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात रस्त्यांचे झाले ओढे !

“मॅट”चा मंत्र्यांच्या मनमानीला चाप; शिफारस पत्रामुळे झालेल्या बदलीला स्थगिती!

एकनाथ शिंदे यांनी स्थापन केली अध्यात्मिक संघटना; दुष्काळी भागातील महाराजांकडे दिली जबाबदारी

यावेळी मंत्री चव्हाण यांनी परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही त्यांनी दिले. परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी दोन कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी