29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रMakers of Modern Dalit History : रविवारी 'मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री'...

Makers of Modern Dalit History : रविवारी ‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री’ पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

'मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री' या पेंग्विन रॅंडम हाऊसने प्रकाशित केलेल्या सुदर्शन रामबद्रन आणि डॉ. गुरू प्रकाश पासवान लिखीत या पुस्तकाचा मराठी अनुवाद परम मित्र पब्लिकेशनातर्फे ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी 'दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार' या नावाने केला आहे.

‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्ट्री’ या पेंग्विन रॅंडम हाऊसने प्रकाशित केलेल्या सुदर्शन रामबद्रन आणि डॉ. गुरू प्रकाश पासवान लिखीत या पुस्तकाचा मराठी अनुवाद परम मित्र पब्लिकेशनातर्फे ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी ‘दलित इतिहासाचे आधुनिक शिल्पकार’ या नावाने केला आहे. या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (27 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सहा वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऑफिथिएटरमध्ये होणार आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन कॉलेज आणि दलित इंडियन चेंबर्स अँन्ड इंडस्ट्रीज (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज-डिक्की’ संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, विशेष अतिथी नामवंत लेखक शरणकुमार लिंबाळे, मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. उज्ज्वला हातागळे उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा :
Ravikant Tupkar: राज्य सरकार झुकले; 157 कोटींची मदत जाहीर

Sharad Pawar: ‘राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या’

Uddhav Thackeray : राज्यपालांना हटवा; उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा

दलित व्यक्तीमत्त्वांच्या कार्याचा आढावा
‘मेकर्स ऑफ मॉडर्न दलित हिस्टरी’ हे पुस्तक इंग्रजी पुस्तक तीन भागात आहे. पहिला भाग आहे प्रस्तावनेचा. दुसऱ्या भागात पाच हजार वर्षांपासूनच्या भारतीय इतिहासातील दलित व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तर तिसऱ्या भागात पुस्तकाचा समारोप असून यात एकविसाव्या शतकात दलित समाजाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तिमत्त्वांचा परिचय देण्यात आला आहे. पहिल्या भागात व्यास-वाल्मिकींपासून बाबासाहेब आंबेडकर आणि बाबू जगजीवनराम अशा सुमारे अठरा-एकोणीस व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा या पुस्तकात आहे. पुस्तकाचा दुसरा भाग आहे सुमारे 149 पृष्ठांचा असून त्यात अठरा व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या भागात 13 व्यक्तिमत्त्वांविषयीच्या कार्याचा आढावा घेतला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी