23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रकांद्यावरील निर्यात शुल्क हटवा; नीलेश लंके यांची पियुष गोयलकडे मागणी 

कांद्यावरील निर्यात शुल्क हटवा; नीलेश लंके यांची पियुष गोयलकडे मागणी 

निर्यात शुल्क तात्काळ हटविण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी शुक्रवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेउन केली.(Remove export duty on onion; Nilesh Lanke's demand to Piyush Goyal)

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यातच शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के निर्यात लावला आहेर. मात्र, हा निर्यात शुल्क तात्काळ हटविण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी शुक्रवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्यमंत्री जितिन प्रसाद यांची भेट घेउन केली. (Remove export duty on onion; Nilesh Lanke’s demand to Piyush Goyal)

शेतकऱ्यांच्या कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा; अजित पवार यांची केंद्राकडे मागणी

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री पियुष गोयल यांना भेटलेल्या  शिष्टमंडळात खासदार नीलेश लंके, बजरंग सोनवणे, खा. शोभा बच्छाव, खा. राजाभाउ वाझे, खा. गोवाल पाडवी, खा. वर्षा गायकवाड, खा. भास्कर भगरे, खा. मारूतीराव कोवासे यांचा समावेश होता. खा. लंके यांनी पियुष गोयल यांच्याशी संवाद साधत असतांना राज्यातील कांदा उत्पादन तसेच भाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाबाबत चर्चा केली. (Remove export duty on onion; Nilesh Lanke’s demand to Piyush Goyal)

फडणविसांनी वंजारी समाजाचे दोन मंत्री केले, धनगरांना फेकून दिले

महाराष्ट्रातील कांद्याला विदेशात मागणी आहे. त्यामुळे परदेशात मोठया प्रमाणावर महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात केली जाते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. अगोदरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. असे असताना भारत सरकारने कांद्याच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठे नुकसान झाले आहे. या शुल्कामुळे कांद्याच्या निर्यातीवरही परिणाम होत असल्याचे खा. लंके यांनी या निवेदनात नमुद केले आहे. (Remove export duty on onion; Nilesh Lanke’s demand to Piyush Goyal)

महाराष्ट्रामध्ये उन्हाळी कांद्याचा साठा संपला असून राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये गुलाबी कांद्याची आवक होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठया प्रमाणावर आवक झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आगोदरच अवकाळी पाउस, बदलते हवामान यामुळे कांदा उत्पादनात आणि उत्पन्नातही घट आली आहे. तर दुसरीकडे त्यांना त्यांचा कांदा कमी दरात विकावा लागत असल्याचे खा. लंके यांनी मंत्री पियुष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. (Remove export duty on onion; Nilesh Lanke’s demand to Piyush Goyal)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी