30 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमहाराष्ट्ररिया चक्रवर्ती 'या' व्यक्तीला करतेय डेट? सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर भोगले मोठे दु:ख

रिया चक्रवर्ती ‘या’ व्यक्तीला करतेय डेट? सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर भोगले मोठे दु:ख

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे नाव चर्चेत आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर तिला चौकशांचा सामना करावा लागला. माध्यमांनी तिची मिडीया ट्रायल घेतली. दरम्यान आता ती या सगळ्यातून सावरली असून ती एका व्यक्तीच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सुशांत सिंग याच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे आरोप केले होते. तसेच सुशांतसाठी तीने ड्रग्ज खरेदी केल्याचे आरोप देखील केले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने देखील तिला अटक केली होती. या सगळ्या प्रकारानंतर आता रियाने पून्हा आयुष्य सावरत कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच भूतकाळ विसरत पुन्हा एकदा नात्यात आहे. उद्योगपती निखिल कामत याच्यासोबत रिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या दोघांकडून देखील या नात्याचा अद्याप खुलासा केलेला नाही.
हे सुद्धा वाचा 
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी
चीनचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर पुन्हा दावा; सीमाप्रश्न पुन्हा चिघळणार
गदर 2 मध्ये सनी देओलच्या ऐवजी गोविंदाला मिळणार होता रोल?

निखिल कामत हे तरुण उद्योजक आहेत. त्यांची एकुन संपत्ती 9000 कोटींहून अधिक आहे. गेल्यावर्षी त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर ते आता रियासोबत नात्याच असल्याचे बोलले जात आहे. या आधी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर सोबत ते नात्यात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ते दोघे अनेकदा एकत्र दिसून आले होते. मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण पुढे आले नाही. दरम्यान कामथ आता रिया चक्रवर्तीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी