32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र'ऋषी सुनक' ठरतेय बेस्ट सेलर; दिंगबर दराडे लिखीत पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद

‘ऋषी सुनक’ ठरतेय बेस्ट सेलर; दिंगबर दराडे लिखीत पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या व्यक्तीमत्त्वाबर आधारलेले ‘ऋषी सुनक’ हे वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून त्याला वाचकांची मोठी पसंती मिळत आहे. या पुस्तकाची पहिली 2000 प्रतींची आवृत्ती छापली होती. या पुस्तकाला मिळत असलेला उदंड प्रतिसाद पाहता अल्पावधीतच दुसरी 2000 प्रतींची आवृ्त्ती छापण्यात येत आहे. हे पुस्तक मराठी साहित्यविश्वात ‘बेस्ट सेलर’ ठरत आहे.

पत्रकार दिगंबर दराडे यांनी ऋषी सुनक यांचा जीवनप्रवास, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू जाणून घेण्यासाठी खास लंडनमध्ये भेट दिली. आयटी क्षेत्रातील मतब्बर अशा इन्फोसिस’ कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत. ऋषी सुनक यांच्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करुन देणारे अंत्यंत माहितीपूर्ण असे दर्जेदार पुस्तक मराठी वाचकांच्या भेटीस आणले. विशेष म्हणजे या पुस्तकाला तरुणवर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

”माय मिरर”चे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून दोनच दिवसांमध्ये आम्ही दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील सर्व पालकमंत्र्यांची पदे बोगस; सर्व पदे बरखास्त करण्याची प्रफुल्ल कदम यांची मागणी

ऍनिडेस्कची लिंक ओपन केली, वयोवृद्ध व्यक्तीचे बँक खातेच झाले रिकामे; पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

आमदार अपात्रता सुप्रीम कोर्टाने पुन्हा अध्यक्षांकडे पाठविल्यास निर्णय कोण घेणार? नार्वेकर की झिरवाळ?

मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे.
-ऋषी सुनक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी