महाराष्ट्र

रोहीत पवारांचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीकास्त्र, म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई l  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सध्या बंद आहेत. मुंबईत लोकल सर्व सामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी उडी घेतली आहे.

आमदार रोहीत पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल  यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं tweet मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं, असा टोला आमदार रोहीत पवार यांनी लगावला आहे.

तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात, अशी खोचक टीका भाजपवर केली आहे. एवढंच नाही तर रोहीत पवार यांनी मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना श्रमिक रेल्वेबाबत त्यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करुन दिली.

सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु करण्याबाबत चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिले होते. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या सात महिन्यांपासून ठप्प असलेली मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही पाठवण्यात आले आहे. पण, ‘रेल्वे विभाग या कामात खोडा घालत आहे’, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी केला आहे.

मुंबईत कोरोनाचा लाट आता ओसरत चाललेली आहे. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होतं आहे. राज्य सरकारनेही नवरात्रीपासून महिलांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता सर्वांसाठीच लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

राज्य सरकारने मुंबईत लोकल सेवा सुरू करावी, याबद्दले रेल्वे विभागाला पत्र पाठवले आहे. पण, रेल्वे विभागाकडून लोकल सेवा सुरू करण्याच्या कामात खोडा घालत आहे. सर्व सामान्य मुंबईकरांना दिलासा देण्याची गरज आहे, पण यातही राजकारण केले जात आहे’, असा आरोपच गृहमंत्री देशमुख यांनी केला आहे.

राजीक खान

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

24 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

24 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago