30 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरमहाराष्ट्रआरएसएसचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; पोलीस सुरक्षा वाढविली

आरएसएसचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी; पोलीस सुरक्षा वाढविली

नागपूर येथिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय (RSS headquarter) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (bomb blast threat) शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने दिली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने आरएसएस मुख्यालयाची सुरक्षा वाढविली आहे. (Police security increased) पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने व्यक्तीने आरएसएसचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.

पोलीसांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने याबाबत खबरदारी घेत बॉम्ब विरोधी पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आणि आरएसएस मुख्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबविली. या मोहीमेत पोलिसांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. दरम्यान पोलीस धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.
नागपूरचे पोलीस आयु्क्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पोलीस नियंत्रण कक्षाला आज एक अज्ञात फोन आला होता. त्या अज्ञात व्यक्तीने आरएसएसचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली असून पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

अजित पवार यांच्या छ. संभाजी महाराजांबद्द्लच्या विधानावरुन भाजप-शिंदे गट आक्रमक

आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क

याआधी देखील नागपूर पोलिसांना आरएसएसचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीचे पत्र २५ नोव्हेंबर रोजू आले होते. पोलिसांनी या पत्राचा तपास करत एका तरुणाला अटक केली होती. तसेच लखनऊ येथील आरएसएसचे कार्यालय देखील बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी