30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रBharat Jodo Yatara : देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली; राहूल गांधी यांचा मोदींवर...

Bharat Jodo Yatara : देशाची अर्थव्यवस्था बरबाद केली; राहूल गांधी यांचा मोदींवर घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खासदार राहुल गांधी यांनी केला. राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशीची पदयात्रेला सुरूवात झाली आणि पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील राहूल गांधी यांची सभा झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान व केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही पण मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज मात्र माफ होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदारांना विकले जात आहेत परिणामी तरुणांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे.

देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजप, आरएसएस कडून केले जात आहे. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती- धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपावाले कोणत्या देशाचे राष्ट्रभक्त ? असा सवाल विचारात हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
Employment fairs : रोजगार मेळाव्यांसाठी राज्य सरकारने केली कोट्यवधींची तरतूद; मेळावा घेण्यासाठी मिळणार इतका निधी!

Sudha Murti : संभाजी भिडे आणि सुधा मूर्तींची भेट वादाच्या भोवऱ्यात

Bharat Jodo Yatra in Maharashtra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी

दरम्यान, भारत जोडो यात्रेदरम्यान आज सकाळी मृत्यू पावलेल्या काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे 25 लाखांची मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषणा केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी