30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमहाराष्ट्रसाई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

दापोलीतील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना सक्तवसूली संचलनालय (ED) ने शुक्रवारी (दि.10) रोजी सांयकाळी अटक केली. आज कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास चार तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. (Sadanand Kadam arrested by ED in Sai Resort case)

ईडीने सदानंद कदम यांना समन्स पाठविले होते. तसेच ईडीचे अधिकारी आज दापोलीतील कुठेशी गावामध्ये सर्च ऑपरेशनसाठी गेले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी परब यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीला बोलावले होते. कदम यांची चार तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदानंद कदम यांना ईडीच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात बोलविण्यात आले, त्यानंतर चार तास चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आली. 5 तारखेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे मोठी सभा झाली. ही सभा भव्य होण्यासाठी सदानंद कदम यांनी देखील मोठे प्रयत्न केल्याची चर्चा होती. त्यानंतर कदम यांच्यावर चौकशीचा फेरा आल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांचे देखील नाव आहे. त्यांच्याशी सदानंद कदम यांची जवळीक असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. परब यांची देखील ईडीने या प्रकरणात यापूर्वी चौकशी केली आहे. आता कदम यांना अटक केल्यामुळे परब यांच्यावर देखील ईडीचे संकट पुन्हा येणार की काय अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
हे सुद्धा वाचा
आमदार सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत हिरकणी कक्ष सुरू 

क्रिप्टोकरन्सीला मोदी सरकारची मान्यता आहे का? जाणून घ्या नवा कायदा … 

शुभमनच्या सिक्सने बॉल हरवला अन् नेटकऱ्यांनी ट्विटर गाजवलं

सदानंद कदम यांची आज दुपारी साडे तीन वाजल्या पासून सुरू होती चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ही पहिली अटक आहे. दापोली साई रिसॉर्टबाबत पर्यावरण नियमांच उल्लंघन केल्याचा तसेच अवैध बांधकाम आणि इतर अनियमितततेचे देखील या प्रकरणात समावेश आहे. या प्रकरणी मनी लॉनड्रिंग झाल्याचा आरोप करत ED ने केला होता गुन्हा दाखल केला आहे. सदानंद कदम यांना शनिवारी विशेष ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी