28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रSambhaji Bhide : संभाजी भिडे यांना 'टीकली'वरील वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने...

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना ‘टीकली’वरील वक्तव्य भोवणार? राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस!

'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे यांनी टीकलीबाबत एका महिला पत्रकाराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी टीकलीबाबत एका महिला पत्रकाराबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. संभाजी भिडें बुधवारी (2 नोव्हेंबर) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटायला मंत्रालयात आले होते. यावेळी या भेटीनंतर एका महिला पत्रकाराने या भेटीबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता भिडे यांनी त्या महिला पत्रकाराला, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो, प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असे वक्तव्य करत तिला प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान या प्रकरणी आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे यांना त्यांनी केलेल्या वक्यव्याबाबत त्यांच्या सांगली येथील पत्त्यावर भूमिका स्पष्ट करावी असे बजावत नोटीस पाठविली आहे. ‘महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामागील तुमच्या भूमिकेचा खुलासा कारावा, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Pune News : गज्या मारणे टोळीला मोठा धक्का; फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

Maharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या फेसबुकवर एका कवितेची पोस्ट टाकुन संभाजी भिडे यांना चांगलेच फटकारले आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हेरंब कुलकर्णी यांची ‘तू आणि मी’ ही कविता शेअर केली आहे, या कवितेमधून स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या मनोवृत्तीवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या मुद्द्यावरून संभाजी भिडेंवर टीका केली आहे. ‘भिडे यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करते. पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत असे प्रकार कदापी सहन न होणारे आहेत. सध्या माध्यमकर्मी आणि पत्रकारांना सातत्याने अपमानाला सामोरे जावे लागते आहे, हे निषेधार्ह आहे’, असे ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी