30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमहाराष्ट्रSambhaji Bhide: संभाजी भिडे यांना 'टीकली' प्रकरणी उत्तर देण्यासाठी हवी आहे 10...

Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांना ‘टीकली’ प्रकरणी उत्तर देण्यासाठी हवी आहे 10 दिवसांची मुदत; महिला आयोगाला अर्ज

संभाजी भिडेंना महिला आयोगाने नोटीस पाठवत सविस्तर उत्तर मागवले होते. मात्र आता भिडेंनी महिला आयोगाला उत्तर देण्यासाठी 10 दिवसाचा वाढीव अवधी मागितला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे कायमच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी एका महिला पत्रकाराला ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो’ असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. भिडेंच्या या वक्तव्यावरून सर्वच स्तरातून त्यांच्यावर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी संभाजी भिडेंना महिला आयोगाने नोटीस पाठवत सविस्तर उत्तर मागवले होते. मात्र आता भिडेंनी महिला आयोगाला उत्तर देण्यासाठी 10 दिवसाचा वाढीव अवधी मागितला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला 10 दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे. आता भिडे नेमकं आपल्या वक्तव्याबाबत महिला आयोगाला काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हे सुद्धा वाचा

Shraddha Murder Case : ‘जे झालं ते चुकून झालं!’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे-तेजस्वी यादव यांची भेट देशातील राजकारणाला कलाटणी देईल : आमदार मनिषा कायंदे

Devendra Fadanvis : शेती पंपांच्या वीज जोडण्या कापू नका!; फडणवीसांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना दिलासा

नेमके प्रकरण काय?
संभाजी भिडे हे 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. भेट झाल्यावर पत्रकारांनी संभाजी भिडे यांना घेरले. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. यानंतर भिडेंना महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता, तुझ्या कपाळाला टिकली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही. एवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते, तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, दरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!