34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्र...अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. सध्या कोल्हापूर आणि परिसरातील अनेक भाविक सौंदत्तीच्या यात्रेसाठी गेले आहेत. या भाविकांची सुरक्षा कर्नाटक सरकारने घ्यावी, अन्यथा मला कर्नाटकात यावेल लागेल असा इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन दोन्ही राज्यांतील संबध कमालीचे ताणले आहेत. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला. त्यानंतर महाराष्ट्रभरात कर्नाटक सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी कर्नाटक मधील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. सध्या कोल्हापूर आणि परिसरातील अनेक भाविक सौंदत्तीच्या यात्रेसाठी गेले आहेत. या भाविकांची सुरक्षा कर्नाटक सरकारने घ्यावी, अन्यथा मला कर्नाटकात यावेल लागेल असा इशाराच संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमाप्रश्नावरुन केलेल्या विधानांमुळे सध्या दोन्ही राज्यांमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण आहे. बेळगावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये अशी दर्पोक्ती केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांचा दौरा देखील रद्द झाला. त्या आधी देखील बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगत या गावांना त्यांनी कर्नाटकचे पाणी सोडून महाराष्ट्रावर कुरघोडी केली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटसह काही गावांवर देखील त्यांनी कर्नाटकचा दावा सांगितला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कर्नाटक सरकारच्या विरोधात तीव्र संतापाचे वातावरण निर्मान झाले आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयातच सीमावादाच्या प्रश्नावर निकाल लागेल असे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी देखील प्रयत्नात आहेत. असे असताना आज कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला. त्यामुळे महाराष्ट्रभर कर्नाटक सरकारविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.


दरम्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील ट्विट करत कर्नाटक सकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत, त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.”
हे सुद्धा वाचा
‘स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?’
राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली
शरद पवार मैदानात उतरले; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सज्जड इशारा
सौंदत्तीच्या रेणूका देवीची मोठी यात्रा दरवर्षी भरत असते. या यात्रेला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून देखील हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात. आता देखील सौंदत्तीच्या यात्रेसाठी कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भाविक सौंदत्तीला यात्रेसाठी गेले आहेत. या भाविकांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी, अन्यथा वेळ प्रसंगी मला कर्नाटकमध्ये यावे लागेल असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी