30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमहाराष्ट्र'हर हर महादेव' चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास... संभाजीराजे आक्रमक

‘हर हर महादेव’ चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास… संभाजीराजे आक्रमक

हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या प्रदर्शनाला विरोध करत संभाजीराजे यांनी हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. असा इशारा दिला आहे.

सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून होणारे राजकारण चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरून होणारी वादग्रस्त विधाने आणि मराठी सिनेमांतून इतिहासाचा होणारा चुकीचा प्रचार यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती हे दोघेही चांगलेच आक्रमक जाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे उदयनराजे वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आंदोलने करत असतानाच आता संभाजीराजे छत्रपती यांनी सिनेमांमधून दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या इतिहासाला पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे.

हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या प्रदर्शनाला विरोध करत संभाजीराजे यांनी हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. असा इशारा दिला आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने ेक पत्र लिहीत हा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दोन जुळ्या बहिनींचा एकाच मुलाशी विवाह, आगळ्या-वेगळ्या नात्याची सर्वत्र चर्चा

मुंबईच्या कर्फ्युबाबत मोठी अपडेट, विश्वास नांगरे पाटील म्हणाले..

Photo : भाग्यश्री मोटेचा ‘एकदम कडक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ग्लॅमरस फोटोंवर चाहते होतात फिदा

हर हर महादेव या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीच्या पद्धतीने सादरीकरण झाले असल्याने या चित्रपटाबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. राज्यात अनेक ठिकाणी पा चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले होते. या चित्रपटामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असताना देखील हा वादग्रस्त चित्रपट तुम्ही झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर प्रदर्शित करीत आहात. शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणे योग्य नाही. सदरील चित्रपट टेलिव्हिजन वर प्रदर्शित करू नये, असे स्वराज्य संघटना सूचित करीत आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व त्यासाठी पूर्णतः तुम्ही जबाबदार असाल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसरीकडे गेल्या काही दिवसांत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्याचे पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधाने केली होती. त्याला विरोध म्हणून सध्या उदयनराजे भोसले नमहाराष्ट्रभरात आंदोलने करत आहेत. त्यांनी नुकतीच रायगडावर समाधीस्थळी जाऊन आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!