26 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रनागपुरात ‘संविधान सन्मान संमेलन’ तर संध्याकाळी मुंबईतील BKC मध्ये मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान...

नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलन’ तर संध्याकाळी मुंबईतील BKC मध्ये मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. ('Samvidhan Samman Sammelan in Nagpur and 'Maharashtra Swabhiman Sabha' of Mavia at BKC in Mumbai in the evening.)

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वेच पक्ष पूर्ण तयारीत आहेत. यातच आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी उद्या म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे.(‘Samvidhan Samman Sammelan in Nagpur and ‘Maharashtra Swabhiman Sabha’ of Mavia at BKC in Mumbai in the evening)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनसेची तिसरी यादी जाहीर

तसेच, महाराष्टाची उपराजधानी म्हणून ओळखला जाणाऱ्या नागपुरात दुपारी 1 वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. (‘Samvidhan Samman Sammelan in Nagpur and ‘Maharashtra Swabhiman Sabha’ of Mavia at BKC in Mumbai in the evening)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, BKC मधील सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. (‘Samvidhan Samman Sammelan in Nagpur and ‘Maharashtra Swabhiman Sabha’ of Mavia at BKC in Mumbai in the evening)

या सभेत काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर केल्या जाणार आहेत. काँग्रेस पक्ष या गॅरंटी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचवणार असून महायुतीच्या भ्रष्ट कराभाराबाबत जनजागृती करणार आहे. एकनाथ शिंदे-भाजपा-अजित पवार युती सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे तो मविआ परत आणेल. (‘Samvidhan Samman Sammelan in Nagpur and ‘Maharashtra Swabhiman Sabha’ of Mavia at BKC in Mumbai in the evening)

तसेच भाजपाच्या फेक नेरेटिव्हलाही चोख उत्तर दिले जाईल. काँग्रेसने कर्नाटक विधानसभेपासून गॅरंटी जाहीर केल्या असून ज्या जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरु आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने कोणत्या गॅरंटी जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणी कशी सुरु आहे हे वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाच्या फेक नॅरेटिव्हला राज्यातील जनता बळी पडणार नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले. (‘Samvidhan Samman Sammelan in Nagpur and ‘Maharashtra Swabhiman Sabha’ of Mavia at BKC in Mumbai in the evening)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी