29 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरमहाराष्ट्रSanjay Raut : शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष; संजय राऊतांनी दिला 'महाराष्ट्र...

Sanjay Raut : शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष; संजय राऊतांनी दिला ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनाचा इशारा

भारतीय जनता पक्षातील टगे (नेते) छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आम्हांला शहाणपण शिकवतात अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर हल्ला चढवला. शिवाय महाराजांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष निर्माण झाला असल्याचा दावा देखील राऊतांनी केला आहे.

सध्या संपूर्ण महारायष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होतो. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील शिवाजी महाराजांबाबत चुकीचे विधान केले असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता भाजपावर विरोधी पक्षांनी हल्ला चठवण्यास सुरुवाक केली आहे. अशांतच आता गेल्या काही दिवसांपासून मवाळ भुमिका घेणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील भैारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षातील टगे (नेते) छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून आम्हांला शहाणपण शिकवतात अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर हल्ला चढवला. शिवाय महाराजांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष निर्माण झाला असल्याचा दावा देखील राऊतांनी केला आहे. संजय राऊत यांनी सोमवारी (28 नोव्हेंबर) पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार भाजप नेत्यांकडून केलाजातो. यावर महाराष्ट्राचे मंत्री-आमदार किती दिवस शांत बसणार आहेत. हे आम्हीच नव्हे तर महाराष्ट्र पाहत आहे. किती दिवस शिंदे गटाचे आमदार हात चोळत बसणार आहेत, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला. छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका लोकभावना आहे. शिवाय राज्यपालांचे पुढील कार्यक्रम उधळून लावणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ही जनभावना असून महाराष्ट्र अजूनही शांत आहे असे संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

NZ vs IND 3rd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी वनडे बुधवारी खेळवली जाणार; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

रमेश सांगळे यांच्या ‘आजचा दिवस फक्त’ (व्यसनमुक्तीची संघर्ष गाथा) या पुस्तकास पुरस्कार

पोलीस भरतीचे अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन; धनंजय मुंडे, राजेंद्र पातोडे यांची अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

पंडित नेहरुंनी देखील माफी मागितली होती
संजय राऊत यांनी म्हटले की, पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेव्हा त्यांनी माफी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलण्यात आणि लिखाणात चूक झाली असे लक्षात आल्यानंतरही पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरू यांनी माफी मागितली. मोरारजी देसाई यांचे महाराष्ट्राबाबत काही मतभेद, वादाचे मुद्दे असतील. पण, त्यांच्याकडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्यानंतर त्यांनीदेखील माफी मागितली होती. पण भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे आणि उलट शहाणपण शिकवत आहेत, हे महाराष्ट्र पाहत असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र संतापला असून असंतोष निर्माण झाला आहे. वेळ आल्यावर याची प्रचिती दिसून येईल असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र बंद आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा राज्यातील 12 कोटी जनतेचा अपमान असून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून आंदोलनाचा कृती-कार्यक्रम जाहीर होऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!