29 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमहाराष्ट्र'हे' मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही..! होळीच्या शुभ मुहूर्तावर संजय राऊतांची टीका

‘हे’ मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही..! होळीच्या शुभ मुहूर्तावर संजय राऊतांची टीका

ठाण्यात सध्या शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा हा राडा सुरुच आहे. कारण या गटाचे अस्तित्व ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. सत्तेचा आणि पोलीस बळाचा येथे पूर्णपणे गैरवापर होत आहे.  हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचे काम नाही. पोलिसांच्या आड हल्ले करु नका, समोर या. हे फक्त ठाण्यातच सुरु आहे.  मात्र हे देखील लवकरच संपेल. खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही, असा इशाराही खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते.

भगवा रंग तर आम्हाला प्रिय आहेच मात्र कोणत्याही रंगाची मक्तेदारी कोणाकडेही नाही. सर्व रंग हे निसर्गाने दिलेले आहेत. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भगव्यावर प्रेम करायला शिकवले, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी होळीच्या दिवशी केले आहे.

मी सकाळी चांगलंच बोलतो, ठाण्यात जे सुरु आहे ते थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजप तुमचा वापर करत आहे. तुम्ही किती मोठी चूक केली आहे ती तुम्हाला कळेल. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात असाल तर ते मुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही. हा शुभ संदेश मी मुख्यमंत्र्यांना देत आहे, असे राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून म्हणाले. सत्ताधारीच बेकायदेशीर आहेत.  मी त्यांना काय सांगणार? असा टोला देखील राऊतांनी लगावला.

दरम्यान ठाण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ठाण्याचा बिहार झालाय असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जिल्हास्तरातून ऐकू येतात. ठाण्यात कायद्याचा वचक राहिला नाही. गुंडांनाही आता बंदुकींचा परवाना मिळायला लागला आहे. मात्र, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. पण त्यात त्यांचा दोष नाही, ते बिचारे हुकुमाचे ताबेदार आहेत. परंतु या सर्वामध्ये ठाण्याचं वाटोळं होत आहे, अशी खंत देखील एका राजकीय नेत्याने व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा :शिंदेंना फक्त कागदावरच नाव आणि चिन्ह मिळालं; संजय राऊत यांचा टोला

धनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी