32 C
Mumbai
Wednesday, March 15, 2023
घरमहाराष्ट्रराज्यात 'मुका घ्या मुका' सिनेमा चालू आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

राज्यात ‘मुका घ्या मुका’ सिनेमा चालू आहे; संजय राऊतांचा खोचक टोला

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ते त्यांची पापं लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकत आहेत, असा आरोप केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली होती.

दरम्यान या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्याचे समजताच त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्यात ‘मुका घ्या मुका’ हा सिनेमा सध्या चालू आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही का अटक करत आहात? हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितलं का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. मॉर्फिंगचा विषय नंतर येईल. मला असंख्य कार्यकर्त्यांच्या घरातल्यांचे फोन येत आहेत की, आज आमच्या घरी पोलीस आले. मुळात तो व्हिडीओ संबंधित आमदारांच्या मुलाने काढला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

या प्रकरणात पहिले गुन्हेगार असणारे प्रकाश सुर्वेंनी समोर यायला पाहिजे. दादा कोंडकेंनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. आता नव्याने तो सिनेमा शिंदे गट सुरू करणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्या मारा. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अश्लील वर्तन करत असाल आणि त्यावर कुणाचा आक्षेप असेल तर पहिला गुन्हा असं वर्तन करणाऱ्यांविरोधात दाखल केला पाहिजे. तुम्ही मुके घेतले, तुम्ही निस्तरा. आमच्याकडे बोट दाखवू नका, मत राऊतांनी यावेळी व्यक्त केले.

या वादग्रस्त व्हिडीओशी महाविकासआघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा काडीचाही संबंध नाही. ते त्यांची पापं लपवण्यासाठी, त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असतील तर ते कायद्याचं राज्य नाही, असा संताप राऊत राऊत यांनी व्यक्त केला आहे.

प्रकरण काय ?

शनिवारी गोरेगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये असताना सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे जीपमध्ये असतांना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. या प्रकरणी म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा व्हिडिओ कुणी बनवला आणि कुणी फोरवॉर्ड केला याचा तपास पोलिस करत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा :

विधिमंडळ हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांचे उत्तर; माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच…

विधिमंडळाचा हक्कभंग : संजय राऊत यांचे नक्की काय चुकले ?

शिवसेना शाखेवरुन ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात राडा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी