34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रSanjay Raut Bail : संजय राऊत तुरूंगाबाहेर; शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत

Sanjay Raut Bail : संजय राऊत तुरूंगाबाहेर; शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत

जामीन मंजूर झाल्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास शिवसेना खासदार संजय राऊत गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती तुरूंगाबाहेर आले. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुगांबाहेर गर्दी करून संजय राऊत यांचे जल्लोषात स्वागत केले

जामीन मंजूर झाल्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास शिवसेना खासदार संजय राऊत गळ्यात भगवा गमछा परिधान करुन ऑर्थर रोड मध्यवर्ती तुरूंगाबाहेर आले. यावेळी शिवसेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुगांबाहेर गर्दी करून संजय राऊत यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर फटाके फोडले.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊतांना 102 दिवसानंतर दिलासा मिळाला आहे. मात्र, ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. ईडीने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी केवळ 10 मिनिटात निकाल देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला असून या प्रकरणाची सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे. सुटेकनंतर सुटल्याचा आनंद झाला आहे, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, माध्यमांशी सविस्तर नंतर बोलेन अशी प्रतिक्रिया राऊत यांनी पहिल्यांदा जेलमधून सुटल्यानंतर दिली आहे.

यावेळी आर्थररोड बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत घोषणा दिल्या. यावेळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. यावेळी संजय राऊत तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केले. त्यानंतर राऊत हे तुरुंगातून थेट सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी जात आहेत, त्यानंतर, शिवतिर्थवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर, ते मातोश्रीवर जाणार असल्याचे समजते.
हे सुद्धा वाचा :

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

GramPanchayat Election : राज्यात 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू

Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर

उच्च न्यायालयाने ईडीला खडे बोल सुनावले
आज १०० दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. पण या जामीनाविरोधात ईडीने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या प्रकरणात 10 मिनिटात निर्णय देता येणार नाही असे सांगत जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला खडे बोल सुनावले. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे. राऊतांना कोणतंही कारण नसताना अटक केली. त्यांना १०० दिवस तुरूंगात ठेवले. याप्रकरणी पीएमएल कोर्टात अनेक सुनावणी पार पडल्या. दोन्ही बाजूंच्या अनेक युक्तिवादानंतर पीएमएलए कोर्टाने राऊतांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुमच्या तातडीने अपील करण्यामुळे आम्ही लगेचच राऊतांचा जामीन फेटाळणार नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होती हे पटवून द्या, ईडीला उच्च न्यायालयाने सुनावले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी