29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रसप्तश्रृंगी देवीचं मंदिर दीड महिना बंद राहणार

सप्तश्रृंगी देवीचं मंदिर दीड महिना बंद राहणार

टीम लय भारी

नाशिक: देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी ‘अर्धपीठ’ अशी ओळख असलेले ‘सप्तश्रृंगी’ देवीचं मंदिर दीड महिना बंद राहणार आहे. देवीच्या मुर्तीचे संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदिर परिसरात डागडुजी केली जात होती. 21 जुलैैपासून 7 सप्टेंबरपर्यंत देवीचे दर्शन घेत येणार नाही. तब्बल 45 दिवस मंदिर बंद राहणार आहे. मात्र भाविकांना दर्शन घेण्यासाठी गडाच्या शेवटच्या पायरीजवळ देवीची मुर्ती ठेवण्यात येणार आहे.

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सप्तश्रृंग गडावर ढग फुटी झाली होती. त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी मातीचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणची माती वाहून गेली आहे. नवरात्री उत्सवापूर्वी या परिसराचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

जाणून घ्या: सप्तश्रृंग गडा विषयी

सप्तश्रृंग गड हे नाशिकपासून 60 किमी अंतरावर आहे. हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कळवण तालुक्यात आहे. या ठिकाणी सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असून, समुद्र सपाटीपासून 4659 फुट उंचीवर आहे. या ठिकाणी देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली आहे.देवीला 18 हात आहेत. त्या हातात विविध आयुधे आहेत. ‘सप्तश्रृंग’ म्हणजे ‘सात शिखरे’. या गडाच्या पायथ्याशी ‘नांदूरी’ हे गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आहेत. गडाचा पूर्व भाग खोल दरीने वेढलेला आहे. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तत्रय कुंड अशी कुंडे आहेत. दरीच्या पूर्वेस मार्कंडेय डोंगर आहे. या ठिकाणी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.

हे सुध्दा वाचा:

स्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !

उद्धव ठाकरेंविरोधात संतोष बांगर यांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन

भारतातील सर्वांत वृध्द वाघाचा मृत्यू

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!