29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक पदवीधरमधून सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत!

नाशिक पदवीधरमधून सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत!

मोठ्या राजकीय घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुक (Nashik Graduate Constituency Election) आता राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचीच झाली आहे. भाजपने या मतदार संघात उमेदवार दिला नसला तरी त्यांनी आपले पत्ते अद्याप खुले केले नाहीत. भाजपमधून इच्छुक उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil ) पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करुन त्या मैदानात आहेत, दुसरीकडे काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (satyajit Tambe) बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता निवडणुकीत मोठी रंजकता निर्मान झाली आहे. Satyajit Tambe and Shubhangi Patil There will tough fight in Nashik Graduate Constituency Election

नाशिक पदवीधर मतदार संघावर तशी काँग्रेसची पकड होती. सुधीर तांबे यांनी या मतदारसंघातून विधान परिषदेचे प्रतिनिधीत्त्व केले. त्यामुळे यंदा देखील काँग्रेसला ही जागा सहज जिंकता येईल असेच वाटले होते. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

दुसरीकडे मुळच्या राष्ट्रवादीच्या आणि काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील या भाजपमधून तिकीटासाठी प्रयत्नशिल होत्या. शुभांगी पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर काही काळ स्वत:चे संघटन चालवले. मात्र गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या मतदार संघाची निवडणुक जाहीर झाल्यानंतर भाजपमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.

डझनभराहून अधिक उमेदवार रिंगणात
नाशिक पदवीधर मतदार संघातून डझनभराहून अधिक उमेदवार रिंगणात असले तरी सरळ लढत आता शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यातच होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन केल्यानंतर गुरूवारी (दि.१९) सत्यजित तांबे यांना देखील निंलंबित केले. त्यामुळे सत्यजित तांबे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे यांनी भाजपकडे या आधीच पाठिंबा मागत देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या मैत्रीचे नाते देखील जाहीर केले होते. तसेच गेल्या एक दोन दिवसांपूर्वी त्यांनी दोन दिवसांत भूमिका मांडणार असल्याचे देखील म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

सत्यजित तांबे यांच्याबाबत काँग्रेसचा अखेर मोठा निर्णय; मविआचा पाठिंबा कुणाला?

आमदार कपिल पाटलांची सत्यजित तांबे यांना साथ

सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज; देवेंद्र फडणवीसांच्या मैत्रीचा परिणाम?

मविआचा शुभांगी पाटील यांना पाठींबा
तर इकडे भाजपच्या बंडखोर नेत्या शुभांगी पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर तातडीने मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ठाकरे गट त्यांना पाठींबा देणार का अशा चर्चा देखील जोरात सुरु झाल्या. त्याच वेळी सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला होता. मात्र आज पत्रकारपरिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रीपतपणे शुभांगी पाटील यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता सत्यजित पाटील यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे.

सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देणार का?
सत्यजित तांबे यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपकडे पाठिंबा मागितला होता. मात्र सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपने अद्याप तरी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र भाजपने या निवडणुकीत उमेदवार देखील उभा केलेला नाही. त्यामुळे भाजप सत्यजित तांबे यांना अधिकृतरित्या पाठिंबा जाहीर करणार का? कि सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार ? अशा चर्चांना ऊत आला असला तरी भाजपची निती आता काय असेल याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

निवडणुक चुरशीची होणार!

गेली अनेक वर्षे शुभांगी पाटील या शिक्षकांचे प्रश्न, समस्यांबाबत या मतदार संघात काम करत आहेत. पुर्वी राष्ट्रवादीमध्ये असताना त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीतून बाहेर पडत त्यांनी स्वत:चे संघटन बांधले महाराष्ट टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी या मतदार संघात काम सुरू केले. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधून त्यांना या मतदार संघातून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र पक्षाने प्रतिसाद न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत मातोश्रीवर ठाकरेंची देखील भेट घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांना पाठींबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसमध्ये असताना कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात देखील त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जोरदार काम केले आहे. तसेच सुधीर तांबे यांनी देखील या मतदार संघाचे नेतृत्त्व केले होते. या दोन्ही गोष्टींचा फायदा सत्यजित तांबे यांना होऊ शकतो. तसेच भाजपने सत्यजित तांबे यांना मदत केल्यास भाजपची मते देखील त्यांना मिळू शकतात. त्यामुळे खरी लढत आता या दोन उमेदवारांमध्येच होणार आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी