34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रसत्यजीत तांबे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कामाचा माणूस ओळख सिद्ध केली !

सत्यजीत तांबे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कामाचा माणूस ओळख सिद्ध केली !

आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे तोंड भरुन कौतुक केले आहे. कामाचा माणूस अशी ओळख एकनाथ शिंदे साहेब यांनी पुन्हा एकदा सिध्द केली असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. तांबे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातील सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना तानसा धरणातून (Tansa Dam) कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासाबद्दल दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना 2 स्पीड बोट (speed boat) व लाईफ जॅकेट (Life jacket)पुरवण्यात आल्याचे समजल्यानंतर आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. (Satyajit Tambe said, Eknath Shinde proved his identity as working man!)

सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना तानसा धरणातून कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या प्रवासाबद्दल सांगितले होते. त्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, 09 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या बीबीसी न्यूज मराठीच्या वृत्तानुसार, शहापूर तालुक्यातील तानसा धरण पाणलोट क्षेत्राच्या आसपासच्या 7 आदिवासी पाड्यांमधील 200 कुटुंबांना हॉस्पिटल, शाळा, व इतर सुविधांसाठी अत्यंत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. येथील लोक असुरक्षित अशा प्लास्टिकच्या पाईपच्या तराफ्यातून, जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पर्यायी मार्ग नसल्यामुळे येथील सावरदेव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थी व पालकांना रोज हा संघर्ष करावा लागणं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरी या प्रवाश्यांसाठी तातडीने सुरक्षा किटची व्यवस्था करावी. तसेच, त्यांना सुरक्षित वाहतुकीचा पर्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.


त्यानंतर सावरदेव गावच्या विद्यार्थ्यांना 2 स्पीड बोट व लाईफ जॅकेट पुरवण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने याबाबत निर्णय घेतल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच कामाचा माणूस अशी ओळख एकनाथ शिंदे साहेब यांनी पुन्हा एकदा सिध्द केली ! असे म्हणत त्यांचे कौतुक देखील केले.

हे सुद्धा वाचा

सत्यजीत तांबे यांचा नक्की इरादा काय? बाळासाहेब थोरातांच्या मनधरणीनंतर केले सुचक ट्विट

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; खटला सात सदस्यांच्या खंडपीठासमोर जाणार?

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी