30 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरमहाराष्ट्रसत्यजीत तांबे यांचा नक्की इरादा काय? बाळासाहेब थोरातांच्या मनधरणीनंतर केले सुचक ट्विट

सत्यजीत तांबे यांचा नक्की इरादा काय? बाळासाहेब थोरातांच्या मनधरणीनंतर केले सुचक ट्विट

विधान परिषदेच्या शिक्षक पदविधर मतदार संघाच्या निवडणुकी दरम्यान नाशिक पदवीधरमधून अपक्ष निवडणूक लढवत निवडून आलेले सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी निवडून आल्यानंतर कॉँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आपण आता अपक्षच राहणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. सत्यजीत तांबे यांचे मामा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी एक सुचक ट्विट (tweet) केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra politics) चर्चांना उधान आले आहे. (Satyajit Tambe tweet sparked discussions in Maharashtra politics)

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय जांगडगुत्त्यामुळे ही निवडणूक गाजली. पहिल्यांदा उमेदवारीचा घोळ, त्यानंतर एबी फॉर्मचे राजकारण अशा अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, सत्यजीत तांबे यांनी या सगळ्याला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केले. तांबे कुटुंब, बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसबाहेर ढकलण्याचे षडयंत्र रचल्याचा देखील आरोप सत्यजीत तांबे यांनी केला होता.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी देखील नुकतीच दिल्लीकडे आपली नाराजी कळवत विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची नाराजी दुर करण्याचा देखील प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान थोरात यांनी सोमवारी सत्यजीत तांबे यांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. सत्यजीत तुला काँग्रेस शिवाय आणि काँग्रेसला तुझ्याशिवाय करमणार नाही त्यामुळे काळजी करु नको असे देखील ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

आमचे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य, परिस्थिती शांत होईल अशी आशा करतो; बीबीसीची पहिली प्रतिक्रीया

राणादा आणि पाठकबाईंचं लग्नानंतरचं पहिलं व्हॅलेंटाईन डे; खास क्षण सोशल मिडियावर व्हायरल

मात्र या सर्व घडामोडीनंतर मंगळवारी सत्यजीत तांबे यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी… नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही… क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी” सत्यजीत तांबे यांनी केलेल्या या ट्वि्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून तांबे यांची वाटचाल आता कशी राहील याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी