27 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमहाराष्ट्रआमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंची पहिलीच पत्रकार परिषद; नाना पटोले, एच.के. पाटलांवर डागली...

आमदार झाल्यानंतर सत्यजित तांबेंची पहिलीच पत्रकार परिषद; नाना पटोले, एच.के. पाटलांवर डागली तोफ

तांबे परिवाराला, बाळासाहेब थोरात यांना बदनाम कऱण्यासाठी त्यांना काँग्रेसमधून बाहेर ढकलण्यासाठी प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी षडयंत्र रचून नाशिक पदवीधर निवडणूकीत मला उमेदवारी मिळवून देण्यासाठी अडचणीत आणले, चुकीचा एबी फॉर्म देवून याची आधीच स्क्रीप्ट रचल्याचा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत केला. यावेळी सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि प्रभारी एच.के. पाटील (H. K. Patil) यांच्यावर आरोप करत नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निडणूकीत झालेल्या राजकारणाबद्दल त्यांनी बाजू मांडली. (Satyajit Tambe’s first press conference after becoming an MLA)

सत्यजित तांबे म्हणाले, विधानपरिषदेच्या निवडणूका दिल्लीतून ठरतात. त्यामुंबईतून ठरत नाहीत. त्यामुळे आम्ही प्रभारींच्या संपर्कात होतो. आम्ही पक्षाला सर्व गोष्टी वारंवार सांगितल्या होत्या. त्यांनी देखील शेवटच्या क्षणाला निर्णय घेण्याचे मान्य केले. तुमच्याकडे कोरा एबी फॉ़र्म पाठवून देतो त्यापद्धतीने कोणाला निवडणूक लढायचे ते ठरवू. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी एच.के. पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्या आधी 9 जानेवारीला पक्ष कार्यालयाशी एबी फॉर्मबाबत चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी आपला माणूस नागपूरला पाठवा असे सांगितले. माझा माणूस 10 तारखेला प्रदेशाध्यक्षांनी ज्या ठिकाणी यायला सांगितले होते तेथे सकाळी नागपूरला पोहचला. मात्र तब्बल दहा तास तो बसून राहिला. त्यानंतर पटोले यांचा वडीलांना फोन आला की अमुक व्यक्तीकडे एबी फॉर्म देत आहे. त्यानंतर तो माणूस फॉर्म घेऊन आला. तो माणूस ११ तारखेला इकडे पोहचाला १२ तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ज्यावेळी आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आले जे कोरे दोन फर्म दिले आहेत ते चुकीचे आहेत आणि ते नाशिक पदवीधर मतदार संघाचे नाहीत अशी धक्कादायक माहिती ११ तारखेला समोर आली.  एबी फॉर्म सारखा संवेदनशील मुद्दा प्रदेश कार्यालयाने गहाळपद्धतीने का दिला हा माझा पहिला सवाल करतानाच आजपर्यंत माझ्यावर आरोप झाले पण एकदाही प्रदेश कार्यालयाने चुकीचे फॉर्म दिल्याचे मान्य केले नाही. ही माहिती का दडवली हा सवाल त्यांनी केली.

सत्यजीत तांबे म्हणाले, आम्ही प्रदेश कार्यालयाकडे नाशिक पदवीधरचे फॉर्म देण्याची मागणी केली. ते फ़ॉर्म १२ तारखेला आले. त्यावर सुधीर तांबे यांचे नाव होते. आणि दुसऱ्या उमेदवाराच्या ठिकाणी रेष मारलेली होती. म्हणजे त्या उमेदवाराच्या ठिकाणी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही हे स्पष्ट होते. जर इतकी मोठी चुक प्रदेश काँग्रेस करत असेल तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेसवर काय कारवाई करणार आहे हा माझा सवाल आहे.

तांबे म्हणाले की, माझा स्पष्ट आरोप आहे की, आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जाणिवपूर्वक षटयंत्र रचले, त्याची स्क्रीप्ट तयार होती. त्याचाच भाग म्हणून माझ्या माणसाला फॉर्म घेण्यासाठी बोलवले, 10 ते 12 तास बसवून ठेवले. बंद पाकिटात चुकीचे फॉर्म दिले. राज्यातील एकाही उमेदवारीची उमेदवारी दिल्लीतून जाहीर झाली नाही. मग एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली असा सवाल करत हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. हा डाव बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजीत तांबेंना उमेदवारी न मिळावी यासाठी, आमच्या परिवाराला पक्षाबाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचले होते हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे सत्यजीत तांबे म्हणाले.

एबी फॉर्म नसल्याने अर्ज अपक्ष ठरला

मी ज्यावेळी फॉर्म भरला त्यावेळी एच के पाटील, नाना पटोलेंना फोन करत होतो. पाटील फोन उचलत नव्हते. पटोलेंचा फोन बंद होता. त्यानंतर मी थोरात साहेबांना फोन केला, त्यावेळी ते रुग्णालयात होते. तरीही सव्वा दोन वाजता त्यांनी सांगितले सत्यजीत आपल्यासा काँग्रेसमधून लढायचे आहे. त्यावेळी मी त्यांना एबी फॉर्मची तांत्रिक अडचण सांगितली. ते म्हणाले एच के पाटलांशी बोलून घ्या त्यांनी फोन उचलेले नाहीत यासगळ्यात पावने तीन वाजले. शेवटी मी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नावानेच फॉर्म भरला होता. मी अपक्ष अर्ज भरला नव्हता पण एबी फॉर्म नसल्याने अर्ज अपक्ष ठरला, असे सत्यजीत तांबे म्हणाले.  सत्यजीत तांबे म्हणाले, माध्यमांनी शहानिशा न करता अपक्ष अर्ज भरल्याचे जाहीर केले. मी फॉर्म भरुन बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत मी काँग्रेसचा उमेदवार असल्याचे सांगितले होते. वडीलांनी तर महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचे सांगितले होते. अपक्ष असल्याने माझ्या पाठीशी सर्वांनी रहावे अशी भूमिका मी घेतली आणि सगळ्याच पक्षांकडे पाठींबा मागायला जाणार असल्याचे सांगितले. त्यात भाजपच्या पाठिंब्याचा देखील उल्लेख केला. मात्र सगळीकडे बातम्या पसरवल्या भारतीय जनता पक्ष पाठींबा देणार त्यामुळे या षडयंत्राला बळ देण्याचेच काम केले गेले.

हे सुद्धा वाचा

साहित्य संमेलनात पुस्तकविक्रेत्यांची भोवनीदेखील होईना; हजारो रुपये भाडे घेऊन स्टॉलधारकांना आयोजकांनी सोडले वाऱ्यावर!

HAL Helicopter: आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी सज्ज; मोदींच्या हस्ते सोमवारी होणार उद्घाटन 
अदानी समूहाच्या साम्राज्याला ग्रहण लावणारा अँडरसन आहे तरी कोण? शॉर्ट सेलर करणारा दलाल असल्याचा अदानींचा गौप्यस्फोट

मी माफीचे पत्र देऊनही त्यानंतर दोन तासांत मविआने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा 

दरम्यान मी दिल्लीशी संपर्कात असतानाच मला दिल्लीतून सांगण्यात आले की, तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसला पाठींबा मागा. मी पत्र पाठवले, त्यातील शब्द रचनेवर संपूर्ण दिवस गेला. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागावी लागेल असे सांगितले. मी जाहीर माफी मागण्यास तयार झालो. १९ जानेवारीला मी त्यांना पत्र देखील पाठवले. मी नाना पटोलेंना देखील पाठिंब्यासाठी मागणी केली. दिल्लीतून मला माफी मागण्यास सांगितले. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष आम्ही अमुक उमेदवाराला पाठींबा देणार, तांबेनी धोका दिला असे सांगत सुटले. अमच्यावर फसवणूकीचा आरोप केला. मी माफीचे पत्र देऊनही त्यानंतर दोन तासांत मविआने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला, असे सत्यजीत तांबे म्हणाले.

दिल्लीचे नेतृत्व माझ्याशी बोलत असताना प्रदेश नेतृत्व माझ्या विरोधात

एकाबाजूला दिल्लीचे नेतृत्व माझ्याशी बोलत असताना प्रदेश नेतृत्व माझ्या विरोधात होते. राहूल गांधी भारत जोडो म्हणतात आणि दुसरीकडे राज्यातील काही नेते द्वेशापोटी आमच्या परिवाराविरोधात हा प्रकार केला. माझ्या पक्षाची आणखी बदनामी नको त्यामुळे मी जास्त बोलत नाही. ही माझी शेवटची पत्रकार परिषद असणार आहे. यानंतर आता मी या विषयावर बोलणार नाही, असे सत्यजीत तांबे म्हणाले.

निवडणूकीत आम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांनी मदत केली

सत्यजीत तांबे म्हणाले, निवडणूकीत आम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांनी मदत केली आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. भाजप नेतृत्वाला तर मी पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा. भाजपमधील अनेक लोकांनी माझ्या बुथवर दिवसभर बसून मला मदत केली. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी मदत केली. काँग्रेसच्या तर शंभर टक्के लोक माझ्या सोबत होते. मनसे, आरपीआय, रासपचे लोक माझ्यासोबत होते. सर्व पक्षांनी १०० हून अधिक संघटनांनी मला पाठींबा दिला म्हणून मी एवढ्या ताकतीने निवडून आलो. हे एवढ्या निवडणूकीपूरते मर्यादित नाही. मागच्या चार निवडणूकीत सगळ्या पक्षांनी आम्हाला मदत केली आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी