27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमहाराष्ट्रसौदी अरेबिया करणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

सौदी अरेबिया करणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

नुकताच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जगभरातील अनेक उद्योगांनी सुमारे १ लाख ३७ हजार गुंतवणूकीचे करार केले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येत्या काही काळात मुंबईचा पायाभूत सुविधांची दृष्टीने कायापालट झालेला असेल. आम्ही उद्योग स्नेही धोरण स्वीकारले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, हरित ऊर्जा अशा माध्यमातून पर्यावरण स्नेही गोष्टींना प्राधान्य दिले आहे. या दृष्टीने सौदी अरेबियाच्या विविध प्रकल्प, गुंतवणूकींचे आम्ही स्वागतच करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) भारतातील राजदूत सलेह इद अल हुसेनी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बुधवारी (दि.१) रोजी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या भेटी प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे आदी उच्चाधिकारी उपस्थित होते. (Saudi Arabia will invest in Maharashtra)

राजदूत अल हुसेनी यांनीही महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत गतिमान राज्य असून येथील गुंतवणूक दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करणारे ठरतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योगासह विविध क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक पोषक वातावरण आहे.

यावेळी अल हुसेनी यांनी महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईचे कौतुक केले. ते म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे. येथील कला क्षेत्र देखील समृद्ध आहे. आम्हाला या कलाक्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याची इच्छा आहे. आम्ही भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे, त्यामुळे यातील मोठा भाग महाराष्ट्रात येईल, यात शंका नाही.
अन्न व ऊर्जा या क्षेत्रांना आम्ही प्राधान्य देण्याचे आमचे धोरण आहे.

हे सुद्धा वाचा

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालणा देणारा अर्थसंकल्प : उज्ज्वला हाके

बजेटमधली तुमच्या आमच्या कामाची बातमी : आता महिन्याला वाचू शकतील दहा हजार रुपये; कसे ते समजून घ्या …

IAS चंद्रकात दळवी म्हणतात; अर्थसंकल्पात कृषीला न्याय, ग्रामविकासाकडे दुर्लक्ष

भारताशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी आमचे उभय पक्षीय संबंध आणखी दृढ होतील असे आमचे प्रयत्न आहेत. अल हुसेनी यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतातील राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. नवी दिल्ली बाहेर एखाद्या शहराला दिलेली पहिली भेट ही मुंबईची असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी