29 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रSchool Bus Fire : तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले 20 चिमुकल्यांचे प्राण

School Bus Fire : तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले 20 चिमुकल्यांचे प्राण

जे वाहन विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत होते त्या वाहनाची आरटीओ कार्यालयात कुठलीच नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, शिवाय सदर वाहन अत्यंत जुन्या आणि भंगार अवस्थेत असल्याने पालकवर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत असून सदर वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उस्मानाबाद शहरात आज एक थरारनाट्य घडले. शहरातील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या गाडीत प्राथमिक शाळेचे 20 पेक्षा अधिक विद्यार्थी प्रवास करीत होते. दरम्यान आग लागल्याचे कळताच एकच गोंधळ उडाला परंतु तेथील स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ त्या मुलांना बाहेर काढत होणारी मोठी दुर्घटना टळली आहे, त्यामुळे या तरुणांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. सगळेच विद्यार्थी सुखरूप असल्याने त्यांच्या पालकांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला आहे. सदर घटना शहरातील अरब मस्जिदीसमोर घडली असून यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरात शाळकरी मुलांची वाहतूक करणारा टेम्पो ट्रॅव्हलरला आज सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. त्यावेळी त्या टेम्पोत 20 प्राथमिक शाळेतील मुले प्रवास करीत होती. भरवस्तीतून गाडी जात असताना अचानक गाडीने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला, लहानगी मुलं सुद्धा पुरती घाबरून गेली. दरम्यान, वाहनाला आग लागल्याचे तेथील स्थानिकांना कळताच त्यांना तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि त्यांनी तातडीने मुलांना गाडीच्या बाहेर काढण्यास सुरुवात केली. तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने आज मोठी जीवीतहानी टळल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा…

Sharad Pawar : राज्याच्या प्रमुखाने बाकीच्या गोष्टी सोडून राज्याच्या प्रशासनावर लक्ष द्यावे, शरद पवारांचा कानमंत्र

Aaditya Thackeray : शिंदे सरकार महाराष्ट्रातील रोजगार पळवतेय; आदित्य ठाकरेंचा आरोप

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज आमने – सामने, करणार मोठी घोषणा

दरम्यान, सगळेच विद्यार्थी सनराईज इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत असून सदर घटना शहरातील अरब मस्जिदीसमोर सांगण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांनी सुद्धा वेळीच पोहोचत संबंधित मदतकार्य आणि तातडीने या प्रकरणी हस्तक्षेप करत तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम केले त्यामुळे त्यावेळी कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. जे वाहन विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत होते त्या वाहनाची आरटीओ कार्यालयात कुठलीच नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, शिवाय सदर वाहन अत्यंत जुन्या आणि भंगार अवस्थेत असल्याने पालकवर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास करण्यात येत असून सदर वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी