28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रSeat Belt Compulsion : सीट बेल्ट न घालणाऱ्या प्रवाशांना 1 नोव्हेंबर पासून...

Seat Belt Compulsion : सीट बेल्ट न घालणाऱ्या प्रवाशांना 1 नोव्हेंबर पासून सोसावा लागणार भुर्दंड!

कार मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. हा नियम मंगळवार (1 नोव्हेंबर) पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रासह देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्राच्या माजी आमदार विनायक मेटेंचा अपघातात मृत्यू झाला, तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारकडून रस्ते वाहतुकींचे नियम कठोर करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी दुचाकी चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट आणि कार मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. हा नियम मंगळवार (1 नोव्हेंबर) पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मंगळवार (1नोव्हेंबर) पासुण सीट बेल्ट घालण अनिवार्य. मुंबई पोलीसांनी गेल्या महिण्यातचं (14 ऑक्टोंबर) रोजी ही सुचना जाहीर केली होती, ज्या नुसार वाहन चालक आणि वाहनामध्ये प्रवास करणाऱ्या प्रतेक व्यक्तीला सीट बेल्ट घालण हे बंधनकारक आहे. पोलिसांनी जाहीर केलेल्या नोटीस नुसार जर चालक सीट बेल्ट न लावता किंवा सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन प्रवास करत असल्यास ते दंडनीय असेल. प्रवाशांनी प्रवासा दरम्यान सीट बेल्ट घातला नसेल तर त्यांना शिक्षा सुद्धा होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

Electronics Manufacturing Cluster : राज्यात 500 कोटींचा प्रकल्प होणार; केंद्र सरकारकडून मिळाली मंजूरी !

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची तब्येत खालावली! मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल

रवी राणा ‘वर्षा’वर भेटले, बच्चु कडूंबाबतच्या वक्तव्यावर दिलगिरी; बच्चु कडूंची भूमिका काय?

मुंबई पोलिसांनी असेही सांगितले होते की, ज्यांच्या मोटार वाहनांमध्ये सीट बेल्टची सुविधा नाही आहे त्यांनी सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे आणि यासाठी 1 नोव्हेंबर 2022 ही अंतिम तारीखही निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे सर्व वाहन चालक आणि वाहनात मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना याद्वारे कळविण्यात येते की, 01/11/2022 पासून प्रवास करताना चालक आणि सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. अन्यथा मोटार वाहन (सुधारणा) 2019 च्या कलम 194(B)(1) च्या अंतर्गत चालकावर कारवाई केली जाईल.

दरम्यान, मंगळवारपासून जो व्यक्ती सीट बेल्टचा वापर न करता प्रवास करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी (31 ऑक्टोबर) आणि गेले दोन-तीन दिवस चालकांसह गाडी मालकांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय मंगळवारपासून ही कारवाई कडक करण्याचे आदेश दिले असल्याने आता या कारवाईमुळे पोलिसांच्या तिजोरीत किती रक्कम जमा होणार आणि किती नागरिकांना भुर्दंड सोसावा लागणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी