31 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमहाराष्ट्रशाहरुखच्या 'जवान'चा प्रदर्शनाआधीच जलवा; पण आमिर खानचा आगामी चित्रपट कधी प्रसिद्ध होणार...

शाहरुखच्या ‘जवान’चा प्रदर्शनाआधीच जलवा; पण आमिर खानचा आगामी चित्रपट कधी प्रसिद्ध होणार ?

पठाणच्या यशानंतर शाहरुख खानच्या जवानची जोरदार चर्चा सुरु आहे, शाहरुखला मिळालेल्या प्रचंड यशानंतर सलमान खान, आमिर खान यांच्या चित्रपटांबाबत देखील त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत. बऱ्याच काळापासून ब्रेकवर असलेल्या अमीर खानने आता पुन्हा चित्रपटाच्या तयारीसाठी हालचाली सूरु केल्या आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, 2024 च्या ख्रिसमसला आमिर खानचा नवा चित्रपट प्रदर्शित होईल.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता आमिर खानने आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला. आता आमिर खान नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात करेल.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, आमिर खान प्रॉडक्शनने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील लॉक केली आहे. याबाबतची माहिती देताना चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) समाज माध्यमावर माहिती दिली. सध्या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन चालू आहे. चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत असेल. चित्रपटाचे नाव अद्यापही ठरलेले नाही. याबाबतची अधिक माहिती मिळताच समाज माध्यमांवर शेअर केली जाईल, असेही आदर्श म्हणाले.
हे सुद्धा वाचा 
परिचारिका नोकर भरतीसाठी आलेल्या महिलांची ठाणे महापालिकेकडून गैरसोय, एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडमधील प्रकार
एकता कपूरचे करावे तेवढे कौतुक थोडेच, एमी अवॉर्ड मिळविणारी पहिली भारतीय महिला !

अमिषा पटेलबाबत गदर 2 चा दिग्दर्शक अनिल शर्माची कबुली; म्हणाला…

आमीर खान शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात करीना कपूर खान सोबत दिसला होता. अद्वैत चंदनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९९४ च्या हॉलिवूड क्लासिक फॉरेस्ट गंपचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. दिल्लीतील एका मीडिया इव्हेंटमध्ये करिनाने अलीकडेच लाल सिंग चड्ढा यांच्या अपयशाची कबुली दिली. लाल सिंग चढ्ढा हा एक अप्रतिम चित्रपट होता.आमिरसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचा भाग असल्याचा मला खरोखर अभिमान आहे.

आमीर बॉलीवूडमधला हुशार अभिनेता आहे. लाल सिंग चढ्ढा तुम्ही 20 वर्षांनंतही तुम्ही सहजतेने पाहू शकाल, असे करीना म्हणाली. आमिरने नेहमीच त्याच्या भूमिकांमध्ये प्रयोग केले आहेत. तो नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयोगशील स्क्रिप्टमध्ये 100% यशाची शक्यता नसते, असेही करीनाने सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी