29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रShahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके...

Shahaji Bapu Patil : एकदम ओके म्हणणाऱ्या शहाजी बापूंच्या मतदारसंघात काहीच ओके नाही

शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील शाळेच्या मुलांनीच सगळं ओके आहे असं म्हणणाऱ्या आमदारांची पोलखोल केली आहे. सांगोला मतदारसंघातील शाळेतील मुलांनी आपल्या शाळेची दुरावस्था समोर आणली आहे.

सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) हे त्यांच्या कामामुळे जितके प्रसिद्ध नसतील, तितके ते त्यांच्या ‘काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटिलं’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाले आहेत. बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले शहाजी बापू पाटील हे गुवाहाटीत गेले आणि त्याचवेळी त्यांची त्यांच्या कार्यकर्त्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यावेळी शहाजी बापू पाटील हे त्यांच्या कार्यकर्त्याला गुवाहाटीतील झाडी, डोंगरांचे वर्णन करत सगळं काही ओक्के आहे, असे म्हणाले होते. पण शहाजी बापू पाटील यांचा हा डायलॉग मात्र तेव्हापासून इतका प्रसिद्ध झाला की, या डायलॉगवर लोकांनी गाणी सुद्धा बनवली.

काल (ता. १९ ऑगस्ट) दहिहंडीमध्ये शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती. सेलिब्रिटी आमदार बनलेले शहाजी बापू पाटील यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा हा डायलॉग पुन्हा एकदा एका वेगळ्या शैलीत ऐकवला. पण सगळं ओक्के आहे असे म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात मात्र काहीच ओके नसल्याचे सध्या दिसून येत आहे.

शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील शाळेच्या मुलांनीच सगळं ओके आहे असं म्हणणाऱ्या आमदारांची पोलखोल केली आहे. सांगोला मतदारसंघातील शाळेतील मुलांनी आपल्या शाळेची दुरावस्था समोर आणत सगळं ओके आहे असे सांगणाऱ्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघात काहीच ओके नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता शहाजी बापू यांच्यावर सांगोल्यातील शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. तर लक्ष्मण हाके यांनी शहाजी बापू पाटील यांना चांगले सुनावले सुद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

शहाजी बापूंनी ‘होयची मान डोलवली‘ – हरि नरके

शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील जुनोनी या गावामध्ये असलेल्या प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीच्या आजूबाजूने गेल्या कित्येक वर्षांपासून गटारीचे पाणी वाहत आहे. याबाबतच तक्रार येथील अधिकाऱ्यांना करूनसुद्धा त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शाळेच्या अवतीभोवती असणाऱ्या या सांडपाण्यामुळे विद्यार्थी आजारी पडत असल्याचे येथील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना या सांडपाण्यावरून उड्या मारून शाळेत जावे लागत आहे. तसेच सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांनी ही समस्या मांडल्यानंतर शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत हे उद्या (ता. २१ ऑगस्ट) सांगोल्यात जाहीर सभा घेणार आहेत, यावेळीच आमदार शहाजी बापू पाटील यांचा पंचनामा करण्यात येईल, असे लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर येथील स्थानिक नागरिकांकडून सुद्धा त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी