30 C
Mumbai
Friday, August 25, 2023
घरमहाराष्ट्रकोल्हापूरला जाण्याआधी शरद पवार दुष्काळी माण-खटावमध्ये; प्रभाकर देशमुखांना बळ देणार

कोल्हापूरला जाण्याआधी शरद पवार दुष्काळी माण-खटावमध्ये; प्रभाकर देशमुखांना बळ देणार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आता झंझावाती दौरे सुरु केले आहेत. नाशिक, बीड नंतर पवारांची आज कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे, मात्र त्या आधी पवारांनी दहिवडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. गेल्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या प्रभाकर देशमुख यांना पवार यांनी आता बळ द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या विधानसभा आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता.

शरद पवार सन 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून विजयी झाले होते. सोलापूर जिल्ह्याचा काही भाग आणि सातारा जिल्ह्यातील काही भाग या मतदार संघात येतो. या मतदारसंघात पवारांना माणणारा मोठा वर्ग आहे. शिवाय दुष्काळी खटाव- आणि माण तालुक्यात देखील पवारांची ताकद आहे. दिवंगत सदाशीवराव पोळ यांच्यानंतर निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीतून पवार यांनी पुढे आणले. त्यांना ताकद देत माण-खटाव तालुक्यातून उमेदवारी दिली. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. आज पवार यांनी कोल्हापुरला जाण्याआधी दहिवडी दौरा केला. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी संबोधित केले.

हे सुद्धा वाचा 
गोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा माहितीपटाला पुरस्कार

अजित पवार आमचेच नेते, शरद पवारांचे धक्कादायक विधान; पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा

अंगणवाडी इमारतींचे प्रश्न सुटेनात, आता झेडपी शाळांच्या खोल्यांचा वापर करण्याचा विचार

यावेळी बोलताना पवार म्हणाले, आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत, त्यांना दुष्काळी भागाची जाण नाही. या तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या विचाराची माणसं असायला हवी. खटाव-माण तालुक्यावर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे, त्याच पार्श्वभूमीवर तुमच्याशी संवाद साधावा, मदत करावी म्हणून मी येथे आलोय. इथला खरा प्रश्न आहे, तुम्ही मला लोकसभेत पाठविले, त्यावेळी सुध्दा दुष्काळी स्थिती होती, त्यावेळी चारा छावण्या, पाण्याचे टॅँकर सुरु करुन संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण यांच्या कायमच हा तालुका पाठीशी राहिला. सदाशीराव पोळांच्या पाठीशी तालुक्याने शक्ती उभी केली. हे ऋण मी विसरु शकत नाही, इथल्या लोकांच्या पाठीशी राहणे, प्रश्न सोडविणे हे आमचे कर्तव्य असल्याचे यावेळी पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी